स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यात सायबर लॅबचे उद्घाटन, सचिनची विशेष उपस्थिती
By Admin | Updated: August 15, 2016 12:05 IST2016-08-15T11:55:28+5:302016-08-15T12:05:29+5:30
भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यनिमित्त ठाणे पोलिसांच्या कर्तव्य या जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन सचिन तेंडूलकरच्या हस्ते करण्यात आले.

स्वातंत्र्यदिनानिमित्त ठाण्यात सायबर लॅबचे उद्घाटन, सचिनची विशेष उपस्थिती
>ऑनलाइन लोकमत
ठाणे दि.१५ - : भारताच्या ७० व्या स्वातंत्र्यनिमित्त ठाण्यात विविध कार्यक्रम होत असून ठाणे पोलीस आयुक्तालयातील चौथ्या मजल्यावर उभारण्यात आलेल्या सायबर लॅबचे उद्घाटन पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले. तसेच ठाणे पोलिसांच्या कर्तव्य या जनजागृती उपक्रमाचे उद्घाटन सचिन तेंडूलकर यांच्या हस्ते गडकरी रंगायतन येथे करण्यात आले. यावेळी ठाण्यातील शिवसेनेच्या आमदारांकडून सचिन तेंडुलकरचा विठ्ठल रखुमाईची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला.
त्यानंतर आज दुपारी पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत खरड, ता. अंबरनाथ येथे दुपारी १.३० वाजता कृषी विभागाने जलपूजनाचा कार्यक्रमही आयोजित केला आहे. याशिवाय जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती विशेष ग्रामसभा घेणार आहेत यात आमचा गाव आमचा विकास कार्यक्रमांतर्गत ग्राम विकास आराखड्यांना मंजुरी दिली जाणार आहे.
फोटो - विशाल हळदे