भाजपा कार्यकारिणी बैठकीचे आज उद्घाटन

By Admin | Updated: May 23, 2015 01:04 IST2015-05-23T01:04:19+5:302015-05-23T01:04:19+5:30

अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे.

The inauguration of the BJP executive meeting today | भाजपा कार्यकारिणी बैठकीचे आज उद्घाटन

भाजपा कार्यकारिणी बैठकीचे आज उद्घाटन

तीन दिवस खल : अमित शहा, मुख्यमंत्री कोल्हापुरात दाखल
कोल्हापूर : भारतीय जनता पार्टीच्या तीनदिवसीय प्रदेश कार्यकारिणीची बैठक व राज्य परिषदेचे शनिवारी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन होणार आहे. दिवसभरातील सत्रासाठी पक्षाचे अन्य मंत्री व प्रदेश पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
शिवाजी पेठेतील पेटाळा मैदानावर पक्षाची प्रदेश कार्यकारिणी बैठक व राज्य परिषद होत आहे. शनिवारी सकाळी ११.३० वाजता कार्यकारिणी बैठकीचे उद्घाटन झाल्यानंतर दिवसभरातील विविध सत्रांमध्ये अमित शहा यांच्यासह प्रकाश जावडेकर, राज्याचे महसूलमंत्री एकनाथ खडसे, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, आमदार अतुल भातखळकर, आमदार आशिष शेलार यांचे मार्गदर्शन होणार आहे. या वेळी केंद्रातील व राज्यातील भाजपा सरकारच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सादर केला जाणार आहे. रात्री ८.३० वाजता पक्षाच्या राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे.
बैठकीसाठी निमंत्रित असलेले मंत्री, प्रदेश पदाधिकारी व विशेष निमंत्रित कोल्हापुरात दाखल झाले आहेत. रविवारी दुपारी १२ वाजता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठकीचा समारोप होणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: The inauguration of the BJP executive meeting today