५७ व्या राज्य हौशी नाट्यस्पर्धेला डोंबिवलीत उत्साहात शुभारंभ : महापौर राजेंद्र देवळेकरांनी केले उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 18:49 IST2017-11-07T18:47:59+5:302017-11-07T18:49:04+5:30

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालय आोयजित ५७ व्या महाराष्ट्र हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०१७-२०१८ च्या डोंबिवली केंद्राच्या स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्याचा शुभारंभ केला. साहित्यामध्ये नाटक आणि नाट्याला विशेष महत्व असून राजकारणातही ही कला खूप महत्वाची भूमिका बजावते असे सांगत त्यांनी स्पर्धेत भाग घेणा-या कलाकारांना शूभेच्छा दिल्या.

 Inauguration of the 57th State Amateur Drama Competition in Dombivali: Mayor Rajendra Devlekar inaugurated | ५७ व्या राज्य हौशी नाट्यस्पर्धेला डोंबिवलीत उत्साहात शुभारंभ : महापौर राजेंद्र देवळेकरांनी केले उद्घाटन

डोंबिवली ते बदलापूर,वासिंदच्या २५ संस्थांचा सहभाग

ठळक मुद्देडोंबिवली ते बदलापूर,वासिंदच्या २५ संस्थांचा सहभाग

डोंबिवली: महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचलनालय आोयजित ५७ व्या महाराष्ट्र हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०१७-२०१८ च्या डोंबिवली केंद्राच्या स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. केडीएमसीचे महापौर राजेंद्र देवळेकर यांनी त्याचा शुभारंभ केला. साहित्यामध्ये नाटक आणि नाट्याला विशेष महत्व असून राजकारणातही ही कला खूप महत्वाची भूमिका बजावते असे सांगत त्यांनी स्पर्धेत भाग घेणा-या कलाकारांना शूभेच्छा दिल्या.
कल्याण-डोंबिवली परिसरातील स्पर्धकांनी विशेष कष्ट घ्या, आणि या स्पर्धेत यश संपादन करुन येथिल यशस्वी वारसा कायम ठेवावा असे आवाहनही त्यांनी केले. ६ नोव्हेंबर ते २० डिसेंबर या कालावधीत प्राथमिक फेरीचे सर्व प्रयोग हे सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर,डोंबिवली पूर्व येथे संध्याकाळी ७ वाजाता संपन्न होणार आहेत. सोमवारी विजिगिषा फाऊंडेशन, कल्याण या संस्थेने रिलेटिव्ह हे नाट्य सादर केले असू स्वप्नील चव्हाण हे त्याचे लेखक आहेत. दिड महिन्याच्या कालावधीत कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर, आणि वासिंद येथिल २५ संस्था या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. शुभारंभाला नाट्यगृहाचे व्यवस्थापक दत्तात्रय लधवा यांच्यासह नाट्यक्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित होते. दिपाली काळे यांनी उद्घाटनाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
===============

Web Title:  Inauguration of the 57th State Amateur Drama Competition in Dombivali: Mayor Rajendra Devlekar inaugurated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.