शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यभरात दरवर्षी जातात नाहक बळी; पतंगासाठीच्या चिनी मांजामुळे पक्ष्यांवर ‘संक्रांत’!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 14, 2020 09:31 IST

‘तीळगूळ घ्या, गोड-गोड बोला’ अन् पतंगासाठी साधा धागा वापरा...

मुंबई : पतंग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या चिनी मांजाच्या विक्रीवर बंदी असताना सर्रास विक्री होते. संक्रांतीच्या काळात म्हणजे साधारण डिसेंबर आणि जानेवारी महिन्यांत या चिनी मांजामुळे अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. ‘लोकमत’ पर्यावरण डेस्कने राज्यातील काही ठराविक शहरांची आकडेवारी मिळविली असता ही संख्या काही हजारांच्या घरात जाते. याशिवाय जखमी होणाºया पक्ष्यांची संख्या वेगळीच.

मकरसंक्रांत जवळ आली की, आकाशात उडणाºया पतंगांचे प्रमाण वाढते. यासाठी धारदार मांजाचा वापर केला जातो. काहीवेळा तर नायलॉन मांजा, तंगूस आणि गट्टू मांजा वापरला जातो. मात्र, अशा मांजामुळे मनुष्यप्राण्यासह पक्षी जखमी होतात. या पार्श्वभूमीवर २०१५ साली एका जनहित याचिकेवर न्यायालयाने घातक मांजावर बंदी घातली. २०१७ साली इकोफ्रेंडली मांजा बाजारात आला. मात्र, त्याचा फारसा सकारात्मक परिणाम झाला नाही. २०१८ साली राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने काचेचे लेपण असलेल्या नायलॉन, तंगूसच्या उत्पादनासह विक्रीवर बंदी घातली. मात्र, चिनी मांजाची विक्री अद्यापही सुरूच आहे. पतंग कटल्यानंतर तो कुठेतरी पडून जातो आणि तुटलेला मांजा लटकत राहतो. या लटकणाºया मांजात पक्ष्यांचे पाय किंवा पंख अडकतात. चिनी मांजा रसायनांनी बनविल्याने तो तोडता येत नाही. या मांजामुळे पक्ष्यांना जखम होते. अनेक वेळा ते त्यांच्या जिवावर बेतते. त्यामुळे सर्वांनी या सणाच्या काळात ‘तीळगूळ घ्या, गोड-गोड बोला’ यासोबतच पतंगासाठी साधा धागा वापरा, हा संदेश द्यावा, असे आवाहन पक्षीप्रेमींकडून केले जात आहे.२०१८ साली मकरसंक्रांतीच्या दिवशी पतंगाच्या मांजामुळे मुंबईत सुमारे ५५० पक्षी जखमी झाले. यातील ४० पक्ष्यांचा मृत्यू झाला. आधीच्या वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले. २०१९ साली परळ येथील पशू वैद्यकीय रुग्णालयात मांजामुळे जखमी झालेल्या पक्ष्यांची संख्या १२७ होती; यातील तीन पक्ष्यांचा मृत्यू झाला होता. मकरसंक्रांतीला आम्ही आमच्या दोन रुग्णवाहिका तयार ठेवतो. यातील एक रुग्णवाहिका दक्षिण मुंबईत तैनात करण्यात येते. येथे जे पक्षी जखमी होतात; त्यावर रुग्णवाहिकेतच उपचार केले जातात, अशी माहिती परळ येथील बलघोडा रुग्णालयाचे डॉ. जे. सी. खन्ना यांनी ‘लोकमत’ला दिली.पुणे शहरात गेल्यावर्षी चिनी मांजामध्ये अडकलेले एकूण १८७ पक्षी वाचविण्यात आले. ३ पोपट, ४ घारी आणि ३ कावळे मांजामध्ये अडकून झाडावरच मेलेले आढळले. मकरसंक्रातीच्या कालावधीत एक आठवडा पुणे शहरात सुमारे ५५ पक्षी मांजामध्ये अडकल्याच्या घटना घडल्या. त्यात ८ पक्ष्यांचा मृत्यू झाला. संक्रांतीदरम्यानच्या तीन महिन्यांच्या काळात शहरात सुमारे १८७ पक्षी मांजामध्ये अडकल्याचे निदर्शनास आले. त्यात सर्वाधिक ११८ घारी, १९ पोपट आणि इतर पक्षी होते. चिनी मांजाबाबत वनविभागाकडे तक्रार करूनही कारवाई होत नसल्याची खंत पक्षीमित्र संतोष थोरात यांनी व्यक्त केली.संक्रांतीच्या काळात मांजामुळे दरवर्षी मृत्युमुखी पडणाºया पक्ष्यांची संख्या खूप आहे. याची कुठेही शास्त्रशुद्ध पद्धतीने नोंद होत नसली तरी पक्षीप्रेमींकडे उपचारासाठी आणण्यात येणाºया पक्षांच्या संख्येवरून अंदाजित आकडेवारी काढता येते. याविषयी पक्षीमित्र डॉ. किशोर पाठक म्हणाले की, ‘औरंगाबादेत ही संख्या वर्षाला पाचशेच्या घरात जाते. यापैकी निम्म्याहून अधिक पक्षी संक्रांत काळात मांजा लागून मरण पावतात.’गतवर्षी मकर संक्रांतीच्या काळात मांज्यामुळे नगर शहरासह परिसरात कबुतरे, कावळा आणि होला हे पक्षी उपचार न मिळाल्याने मरण पावले, अशी माहिती पक्षीमित्र सुधाकर कुºहाडे यांनी दिली़२०१८ साली झाडांच्या फांद्यांवर तडफडत लटकणाºया १६५ पक्ष्यांची नाशिक मनपा अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली होती. २०१९ साली अग्निशमन दलाने जानेवारी ते डिसेंबरपर्यंत १३८ पक्ष्यांची नायलॉनच्या सापळ्यातून सुटका केली. २०१८ साली सुमारे ७२ पक्ष्यांना जीव गमवावा लागला, तर २०१९ साली जानेवारी ते डिसेंबरपर्यंत १०० हून अधिक पक्षी मृत्युमुखी पडल्याची भीती पक्षीप्रेमींनी व्यक्त केली आहे.काय काळजी घ्याल?

  • चिनी किंवा नायलॉयनचा मांजा न वापरता पतंगासाठी साधा धागा वापरावा.
  • पतंग कटल्यानंतर तुटलेला मांजा नष्ट करा.
  • विजेच्या तारांवर अडकलेले पतंग सोडवण्याचा प्रयत्न करू नका.
  • मांजामध्ये एखादा पक्षी अडकलेला आढळल्यास पक्षीमित्र संघटनांच्या प्रतिनिधींना तातडीने संपर्क करा.
टॅग्स :Makar Sankrantiमकर संक्रांतीenvironmentपर्यावरण