शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थ पवारांना डेटा सेंटर म्हणून एवढी मोठी सूट मिळाली, पण...; पुण्यातील जमीन घोटाळ्यात मोठी माहिती समोर
2
'जरांगे, थोतांड करू नका! आरोपी यांचेच, आरोपही हेच करणार'; हत्येची सुपारी दिल्याच्या आरोपावर धनंजय मुंडेंचा संताप
3
"मते चोरून सत्तेत आलेल्यांनीच जमीन चोरली, कारण त्यांना..."; राहुल गांधींचा पार्थ पवार भूखंड खरेदी प्रकरणावरून घणाघात
4
हात मिळवता मिळवता एकमेकांचे पाय खेचू लागले चीन-अमेरिका; China च्या एका निर्णयानं ट्रम्प यांचा तिळपापड
5
केक कापला, डीजे लावला आणि..., शेतकऱ्याने दणक्यात साजरा केला रेड्याचा वाढदिवस
6
१० लोकांना संपवलं, २७ जणांना मारण्याच्या तयारीत; नर्स रुग्णांच्या जीवावर का उठली? कारण ऐकाल तर..
7
माझी अन् त्यांची एकदा नार्को टेस्ट करा; जरांगे पाटलांच्या आरोपांवर धनंजय मुंडेंचे प्रत्युत्तर
8
चिकन नेकजवळ भारतीय लष्करानं केलं असं काम, शत्रूची प्रत्येक चाल होणार फेल
9
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दर घसरले; खरेदी करण्यापूर्वी पाहा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे लेटेस्ट रेट
10
मी काका झालो! कौशल कुटुंबात आला छोटा पाहुणा; विकीचा भाऊ सनीने व्यक्त केला आनंद
11
IPS Aakash Shrishrimal : एक नंबर! वडील उद्योगपती, आई LIC एजंट, बहीण CA... अभिनेत्रीचा पती आहे IPS ऑफिसर
12
Crime: चाकूचा धाक दाखवून परप्रांतीय कामगाराला मारहाण; पाय चाटण्यास भाग पाडले!
13
सर्वात व्यस्त दिल्ली विमानतळावर ‘ट्रॅफिक जाम’! ३०० हून अधिक विमानांना विलंब; पार्किंगलाही जागा नाही!
14
घर खरेदी करण्याची योग्य वेळ कोणती? तुमच्या पगारावर EMI चा किती बोजा असावा, 'हे' गणित तपासा!
15
ज्ञानेश कुमार निवृत्तीनंतर शांतपणे आयुष्य जगता येणार नाही..; प्रियंका गांधींचा निवडणूक आयुक्तांना इशारा
16
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी घेतली अण्णा हजारेंची भेट; नेमके काय बोलणे झाले? चर्चांना उधाण
17
'इंग्रजांची साथ; 52 वर्षे तिरंगा फडकवला नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपा-RSS वर गंभीर आरोप
18
बँक कर्मचाऱ्यांनी स्थानिक भाषेतच बोलावं, अर्थमंत्री निर्मला सीतारामन का म्हणाल्या असं?
19
'चांगल्यापैकी पोटगी मिळतेय'; मासिक १० लाख मिळवण्यासाठी हसीन जहाँ सुप्रीम कोर्टात, मोहम्मद शमीला नोटीस
20
'तुमच्या मुलाचा दोष नाही', एअर इंडिया विमान अपघातातील पायलटच्या वडिलांची सर्वोच्च न्यायालयात धाव

फेरीवाल्यांकडील ९६ टक्के बर्फ नमुने खाण्यास अयोग्य

By admin | Updated: April 28, 2017 02:43 IST

उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने हैराण झालेले मुंबईकर आपोआपच एखाद्या ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचा स्टॉल आणि गोळेवाल्याकडे

मुंबई : उन्हाच्या वाढत्या पाऱ्याने हैराण झालेले मुंबईकर आपोआपच एखाद्या ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचा स्टॉल आणि गोळेवाल्याकडे वळतात. अवघ्या १०-२० रुपयांत तहान भागविणाऱ्या या पेयांत आरोग्याला हानीकारक घटक असल्याचे नुकतेच निष्पन्न झाले आहे. त्यामुळे केवळ ‘कूल’ होण्यासाठी या पेयांचे सेवन टाळावे. तसेच, जलजन्य आजारांच्या प्रतिबंधासाठी काळजी घेण्याचे महापालिकेद्वारे आवाहन करण्यात आले आहे.महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने महापालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांमधील खाद्यपदार्थ व पेयपदार्थ विकणारे फ्रूट ज्यूस सेंटर, उसाच्या रसाचे स्टॉल्स, बर्फाचे गोळेवाले, लस्सी व ताक विक्रेते, फास्ट फूड सेंटर्स इत्यादी फेरीवाल्यांकडील बर्फ नमुने; तसेच उपाहारगृहातील बर्फाच्या नमुन्यांची चाचणी केली असता सरासरी ९६ टक्के बर्फ नमुने हे खाण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे. तर याच नमुन्यांपैकी ७५ टक्के नमुन्यांमध्ये ‘ई-कोलाय’ जीवाणू आढळून आले आहेत. (प्रतिनिधी)घरी शिजवलेले ताजे अन्न खा !प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून जेवणापूर्वी व अन्न शिजवताना, तसेच शौचानंतर हात साबणाने स्वच्छ धुवावेत; घरी शिजवलेले ताजे अन्न खावे, हिरव्या पालेभाज्या - फळे स्वच्छ धुऊन खावेत, तसेच वैयक्तिक स्वच्छता काटेकोरपणे राखण्याचेही आवाहन करण्यात आले आहे. मळमळ, उलटी, जुलाब यासारखी लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, अशी सूचना डॉ. पद्मजा केसकर यांनी केली आहे.सर्वाधिक प्रमाण ‘एम पूर्व’ विभागातमहापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये सरासरी ७५ टक्के बर्फ नमुन्यांमध्ये ई-कोलाय जीवाणू आढळून आले आहेत. यामध्ये सर्वाधिक प्रमाण हे गोवंडी, देवनार इत्यादी परिसरांचा समावेश असणाऱ्या ‘एम पूर्व’ या विभागात आढळून आले आहे. या विभागातील सर्वच्या सर्व म्हणजेच १०० टक्के बर्फ नमुन्यांमध्ये ई-कोलाय जीवाणू आढळून आले आहेत.२७ टक्के पाणी नमुने अयोग्य, १० टक्के पाण्यात ‘ई-कोलाय’खाद्य व पेय पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांकडील पाणी नमुन्यांमध्येदेखील ‘ई-कोलाय’बाधित नमुने मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. महापालिका क्षेत्रातील सर्व २४ विभागांमध्ये सरासरी २७ टक्के पाणी नमुने हे पिण्यासाठी अयोग्य असल्याचे; तर सरासरी १० टक्के पाणी नमुने हे ई-कोलाय बाधित असल्याचे आढळून आले आहे.हे टाळा...महापालिका क्षेत्रातील बर्फ व पाणी नमुन्यांमध्ये आढळून आलेले ई-कोलाय जीवाणूंचे प्रमाण लक्षात घेता रस्त्यावरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत, बाहेरील पाणी - सरबत, उसाचा, फळांचा रस इत्यादी पिणे टाळावे, तसेच पाणीपुरी - भेळपुरीसारखे पदार्थ खाणेही टाळावे, असे आवाहन महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे करण्यात आले आहे.२४ पैकी १४ विभागांतील नमुने अयोग्य-१ ते २५ एप्रिल २०१७ या कालावधीत महापालिकेच्या २४ प्रशासकीय विभागांच्या क्षेत्रातील खाद्यपदार्थ व पेयपदार्थ विक्रेत्यांकडील बर्फ व पाणी नमुन्यांची चाचणी करण्यात आली. या चाचणी दरम्यान महापालिकेच्या २४ पैकी १४ विभागांतील सर्व म्हणजेच १०० टक्के बर्फ नमुने हे खाण्यास वा पिण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे, अशी माहिती महापालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याद्वारे देण्यात आली आहे.कार्यवाहीसाठी एफडीएला माहितीखाद्य व पेय पदार्थ विकणाऱ्या फेरीवाल्यांकडील बर्फ हा ‘आइस फॅक्टरी’मध्ये तयार होत असल्याने त्याबाबत कार्यवाही करण्यासाठी राज्य शासनाच्या ‘अन्न व औषध प्रशासन खात्या’ला कळविण्यात आले आहे, अशीही माहिती महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. केसकर यांनी दिली आहे.