शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या मातीत अखेर भाजप चीतपट; महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या एकजुटीचा विजय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2022 08:58 IST

काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये आकस्मिक निधन झाले. जाधव मूळचे भाजपचे...

कोल्हापूर : महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतीलकाँग्रेसच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी भाजपचे उमेदवार सत्यजित कदम यांचा १९ हजार ३०७ मतांनी पराभव केला. जाधव यांच्या विजयास महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांची भक्कम एकजूट व शिवसेनेने मनापासून केलेली मदत कारणीभूत ठरली.

ही निवडणूक हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नेण्याचा भाजपने आटोकाट प्रयत्न केला; परंतु शाहू महाराजांच्या कोल्हापूरने त्यास मतपेटीतूनच खणखणीत उत्तर देऊन कोल्हापूरचे पुरोगामित्व जपले. जयश्री जाधव या कोल्हापूर शहराच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या.भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील विरुद्ध पालकमंत्री सतेज पाटील यांच्यातील वर्चस्वाच्या लढाईचे या निवडणुकीला स्वरूप आले होते. त्यामध्ये बाजी मारून जिल्ह्याच्या राजकारणात आपणच किंगमेकर असल्याचे  सिद्ध केले.  काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांचे डिसेंबर २०२१ मध्ये आकस्मिक निधन झाले. जाधव मूळचे भाजपचे. त्यांच्या पत्नी जयश्री जाधव या तर भाजपच्या नगरसेविका होत्या. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध करू या, असे प्रयत्न महाविकास आघाडीतून झाले.  माजी आमदार महादेवराव महाडिक यांचे नातेवाईक असलेल्या माजी नगरसेवक सत्यजित कदम यांना मैदानात उतरवले. कदम यांंनी यापूर्वी २००४ ला काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती.  महाडिक गट, भाजपची ताकद आणि शिवसेनेचा नाराज मतदार असे गणित जमले तर सहज गुलाल मिळेल, असा त्यांचा होरा होता; परंतु तसे घडले नाही. 

मुख्यमंत्र्यांचा शब्दआम्ही भाजपला सोडलं.. हिंदुत्व नाही. जीव गेला तरी बेहत्तर परंतु बाळासाहेब ठाकरेंचा कडवा शिवसैनिक शब्द बदलणार नाही. त्याला पाठीतून वार करायचे माहीत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला होता. उमेदवारांना मिळालेली मते अशी - जयश्री जाधव (काँग्रेस) - ९७,३३२ (५४.३२%)सत्यजित कदम (भाजप) - ७८,०२५ (४३.५५%)

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपाPoliticsराजकारणMahavikas Aghadiमहाविकास आघाडी