शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

नववर्षात ढगांचीच गर्दी, थंडी आक्रसणार; काही भागात तुरळक पावसाची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 07:47 IST

मुंबईसह कोकणात ३ ते ७ जानेवारी असे ५ दिवसच ढगाळ वातावरण असेल.

मुंबई : नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच आर्द्रतेमध्ये होणारी वाढ, प्रदूषके  आणि ढगाळ वातावरणामुळे मुंबईसह कोकणातील थंडी गायब होणार आहे. येथे बहुतांशी भागात हवामान ढगाळ नोंदविण्यात येईल, असा अंदाज हवामान अभ्यासकांनी वर्तविला असून, राज्यभरात सर्वसाधारण हीच परिस्थिती राहण्याची शक्यता आहे. मुंबईसह कोकणात ३ ते ७ जानेवारी असे ५ दिवसच ढगाळ वातावरण असेल.

मराठवाडा वगळता उर्वरित महाराष्ट्रातील कोकण व मध्य महाराष्ट्रातील व विदर्भातील जिल्ह्यात १ ते ७ जानेवारी दरम्यानच्या आठवड्यात फक्त काही ठिकाणीच किंचित ढगाळ वातावरण राहू शकते. या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी अगदीच किरकोळ हलक्या पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यात ढगाळ वातावरणासहित पावसाची शक्यता नाही. संपूर्ण महाराष्ट्रात सध्याचे पहाटेचे किमान तापमान हे १६ व दुपारचे कमाल तापमान ३० असून १ ते ७ जानेवारी दरम्यान ते याच पातळीत राहील. 

उत्तर भारतातील धुक्याचा परिणाम नाही ही दोन्हीही तापमाने दरवर्षी या काळात नेहमीसारखी जशी असतात तशीच सरासरी तापमानाच्या पातळीत असून त्यात विशेष चढ - उतार सध्या तरी जाणवणार नाही.  गेल्या पंधरवड्यापासून संपूर्ण उत्तर भारतात सुरू असलेला धुक्याचा कहर अजूनही तेथे कायम असून  महाराष्ट्रावर त्या वातावरणाचा विशेष असा काहीही परिणाम जाणवणार नाही, अशी माहिती हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे यांनी दिली. 

टॅग्स :weatherहवामानRainपाऊस