शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2025 14:22 IST

राज्यात वीज पडून धुळे येथे १, नाशिक १, संभाजी नगर ४, नंदुरबार १, अमरावती १ असे एकूण ८ जण दगावले आहेत  तर १० जण जखमी आहेत.

मुंबई - राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोर धरला आहे. त्यात हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या अंदाजानुसार पुढील २४ तासाकरता रत्नागिरी, रायगड या जिल्ह्यांना रेड अलर्ट तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट प्रशासनाने जारी केला आहे. त्याशिवाय आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी NDRF,SDRF टीमला सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 

पालघर, ठाणे, पुणे घाट, सातारा घाट, कोल्हापूर घाट आणि सिंधुदुर्ग या परिसरात प्रशासनाकडून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सध्या राज्यातील बऱ्याच जिल्ह्यात पाऊस सुरू असून पूर परिस्थिती नियंत्रणात आहे. मागील २४ तासांत रत्नागिरीत ८८.१ मिमी, रायगड ६५.३ मिमी, सिंधुदुर्ग ५३.८ मिमी, ठाणे २९.६ मिमी, यवतमाळ १७.५ मिमी पाऊस पडलेला आहे. त्याशिवाय राज्यात वीज पडून धुळे येथे १, नाशिक १, संभाजी नगर ४, नंदुरबार १, अमरावती १ असे एकूण ८ जण दगावले आहेत  तर १० जण जखमी आहेत. मान्सूनच्या प्रवासात प्रगती नसली तरी राज्याच्या बहुतांश भागात, विशेषत: मध्य महाराष्ट्र आणि कोकण पट्ट्यात काही ठिकाणी मात्र तो कोसळत आहे.

४० वर्षांत प्रथमच जूनमध्येच भरले सीना धरण

सीना नदीचे उगमस्थान तसेच प्रवाह परिसरात मे महिन्यातच वारंवार जोरदार पाऊस झाल्याने यंदा प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यातील निमगाव गांगर्डा येथील सीना धरण जूनमध्येच भरले असून सांडव्यातून पाणी वाहू लागले आहे.  गेल्या ४० वर्षांत प्रथमच मान्सूनच्या प्रारंभी जूनमध्येच धरण भरले आहे. सीना धरण भरले असल्याची अधिकृत माहिती तहसीलदार गुरू बिराजदार यांनी दिली

मुंबईतही पावसाचा जोर

शनिवारी संध्याकाळपासून मुंबई शहरात सतत पाऊस पडत आहे. हवामान विभागाने मुंबईत यलो अलर्ट जारी केला आहे. मुंबईत रात्रभर विजांच्या कडकडाटासह पाऊस पडत होता. मात्र रविवारी सकाळपासून पावसाचा वेग मंदावला. शहरात कुठेही पाणी साचल्याच्या सूचना मिळाल्या नाहीत असं अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Rainपाऊस