शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये शिंदे-ठाकरे गटात झाला जोरदार राडा; आमदार भरत गोगावलेंची निषेध फेरी रोखल्याने तणाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 09:25 IST

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भरत गोगावले यांचा पुतळा जाळून निषेध केला जाणार होता. तत्पूर्वी, शिंदे गटाच्या भरत गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी केली.

लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : आमदार भरत गोगावले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी महाडमध्ये शुक्रवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी निषेध रॅलीचे आयोजन केले होते. मात्र, हा निषेध शिंदे गटाच्या शिवसैनिकांनी रोखला. यावरून छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये दोन गटांत जोरदार राडा झाला. परिसरात तणावाचे वातावरण होते.

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने भरत गोगावले यांचा पुतळा जाळून निषेध केला जाणार होता. तत्पूर्वी, शिंदे गटाच्या भरत गोगावले समर्थकांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गर्दी केली. गोगावले समर्थकांनी जर उद्धव गटाच्या वतीने निषेध व्यक्त झाला तर त्यांचे कार्यालय फोडू, असा पवित्रा घेतला. यामुळे दोन्ही गटांचे कार्यकर्ते आमने-सामने आले. 

एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाणछत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी गोगावले समर्थकांनी फळी उभी केली. दोन्ही गटांमध्ये हाणामारी झाली. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालताना दोन्ही गट आमने-सामने आले. एकमेकांच्या अंगावर धावून जात मारहाण झाली. यावेळी दोन्ही गटांकडून घोषणाबाजी करण्यात आली.

...अखेर महिला पोलिस  कर्मचाऱ्याने घातला महाराजांना पुष्पहारछत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये चोख पोलिस बंदोबस्त होता. मात्र, दोन्ही गटांकडून एकमेकांवर धावून जाण्याचे प्रकार घडले. छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालण्यावरून चढाओढ झाली. दोन तासांच्या तणावपूर्ण परिस्थितीनंतर पोलिसांना पुतळा परिसर ताब्यात घेण्यात यश आले. जमलेल्या कार्यकर्त्यांना बाजूला करून एका पोलिस कर्मचारी महिलेने छत्रपती शिवाजी महाराजांना हार घातला. जवळपास शिवाजी महाराज चौकामध्ये दोन तास दोन्ही गटांत राडा सुरू राहिला. माणगाव पोलिस उपविभागीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जमावाला पांगविण्यात यश मिळविले.

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना