शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:48 IST

कलम ५५ अंतर्गत विशेष सभा बोलवण्याची त्यांची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली असून येत्या २५ जूनला सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे. 

धुळे - साक्रीच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ सुरू आहे. याठिकाणी नगरपंचायतीत प्रथमच सत्तेत आलेल्या भारतीय जनता पक्षात अंतर्गत फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपा नगराध्यक्षा जयश्री हेमंत पवार यांच्याविरोधात भाजपा नगरसेवकांनीच जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव दाखल केला आहे.

ज्ञानेश्वर नागरे यांच्या राजकीय वर्चस्वाला भाजपाने सुरुंग लावत नगरपंचायतीवर सत्ता मिळवली. त्यात ज्ञानेश्वर नागरे यांची साथ भाजपामधील नाराज गटाला मिळाली आहे. हा अविश्वास प्रस्ताव उपनगराध्यक्ष आणि भाजपाचे गटनेते बापूसाहेब गिते यांनी आणला आहे. त्यांना शिंदे सेना आणि काँग्रेसच्या एका सदस्याचा पाठिंबा आहे. नगरपंचायतीमध्ये भाजपाची सत्ता आल्यानंतर दोन्हीही सदस्यांना अडीच वर्ष संधी मिळावी असा अलिखित करार झाला होता. मात्र अडीच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होऊनही नगराध्यक्षा जयश्री पवार यांनी पद सोडण्यास नकार दिल्याने सुरेश पाटील समर्थक नगरसेवकांनी शिंदेसेनेच्या आमदार मंजुळा गावित, ज्ञानेश्वर नागरे यांच्याशी संपर्क साधून हे पाऊल उचलले आहे. या अविश्वास ठरावाच्या घटनेमुळे साक्रीचे राजकारण वातावरण चांगलेच तापल्याचे दिसून येत आहे.

या नाराजांची अविश्वास प्रस्तावावर स्वाक्षरी

भाजपाच्या नगराध्यक्षा जयश्री पवार यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर भाजपाचेच गटनेते बापूसाहेब गिते, सभापती संगीता भावसार, प्रवीण निकुंभे, राजेंद्र भोसले, रेखा सोनवणे, उषाबाई पवार, काँग्रेसच्या नर्गिसबी पठाण, शिवसेनेचे पंकज मराठे, सोनल नागरे, सुमित ज्ञानेश्वर नागरे, कल्पना खैरनार आणि राहुल भोसले या १२ नगरसेवकांनी स्वाक्षरी करून १८ जून रोजी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्याकडे अविश्वास प्रस्ताव सादर केला आहे. कलम ५५ अंतर्गत विशेष सभा बोलवण्याची त्यांची विनंती जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केली असून येत्या २५ जूनला सकाळी ११ वाजता ही सभा होणार आहे. 

दरम्यान, नगराध्यक्षा पवार यांच्यावर प्रामुख्याने मनमानी पद्धतीने कारभार करत असून नगरसेवकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आहे. विकासकामांची देयके मंजूर करण्यास टाळाटाळ करणे, वेळेवर बैठका न घेणे, नगरसेवकांना विश्वासात न घेणे आणि शासनाच्या नियमांचे पालन न करणे असे अनेक मुद्दे अविश्वास प्रस्तावात नाराज भाजपा नगरसेवकांनी नमूद केले आहेत. 

उषा पवारांना मिळेल नगराध्यक्षा होण्याची संधी

साक्री नागरपंचायतीचे नगराध्यक्ष पदे हे सध्या अनुसूचित जमाती संवर्गातील महिलेसाठी राखीव आहे. या संवर्गातून जयश्री पवार आणि उषा पवार या भाजपच्या दोन नगरसेविका निवडून आल्या होत्या. अशावेळी जयश्री पवार या पायउतार झाल्यास त्यांच्या जागी प्रभाग तीनच्या नगरसेविका उषा अनिल पवार यांना नगराध्यक्षपदाची संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसShiv Senaशिवसेना