शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

दहावी-बारावी परीक्षेत आता आयत्या वेळी मिळेल प्रश्नपत्रिका, शिक्षण मंडळाचा निर्णय; पेपरफुटीवर उतारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2023 06:56 IST

परीक्षा कालावधीत प्रश्नपत्रिका माेबाइलवर तसेच समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याचे काही प्रकार यापूर्वी निदर्शनास आले हाेते.

मुंबई/पुणे : दहावी आणि बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पेपर सुरू हाेण्याच्या निर्धारित वेळेच्या दहा मिनिटांपूर्वी प्रश्नपत्रिका वाचण्यासाठी दिली जात हाेती. यंदा फेब्रुवारी-मार्च महिन्यात हाेणाऱ्या परीक्षेत ही पद्धत बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने हा निर्णय घेतला आहे.

परीक्षा कालावधीत प्रश्नपत्रिका माेबाइलवर तसेच समाज माध्यमांवर प्रसारित झाल्याचे काही प्रकार यापूर्वी निदर्शनास आले हाेते. परीक्षा दालनात परीक्षा सुरू हाेण्यापूर्वी प्रश्नपत्रिकांचे वितरण केल्यामुळे केंद्रावर निर्धारित वेळेनंतर पाेहाेचणाऱ्या विद्यार्थ्यांच्या माेबाइलमध्ये प्रश्नपत्रिकेचा आशय आढळल्याच्या घटनाही यापूर्वी घडल्या आहेत. 

पेपरफुटींच्या अफवांना प्रतिबंध घालणे तसेच भयमुक्त आणि काॅपीमुक्त वातावरणात परीक्षा सुरळीतपणे पार पडाव्यात यासाठी परीक्षेच्या निर्धारित वेळेपूर्वी दहा मिनिटे अगाेदर प्रश्नपत्रिका वितरित करण्याची सुविधा फेब्रुवारी - मार्च २०२३ पासून रद्द करण्यात येत असल्याचे परीक्षा मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी काढलेल्या परिपत्रकात म्हटले आहे.

केव्हा मिळेल पेपर?-  ११ वाजता : सकाळच्या सत्रात-  ३ वाजता : दुपारच्या सत्रात

जीपीआरएस प्रणाली सुरू ठेवावी लागणार-  सर्व परीक्षा केंद्रांवर शिक्षण विभागाकडून नेमण्यात येणाऱ्या भरारी पथकाशिवाय भरारी पथके व बैठी पथके नियुक्त करण्यात येणार आहेत.-  मुख्य परीक्षा केंद्रांवर प्रश्नपत्रिका पोहोचवण्याकरिता व उत्तरपत्रिका आणण्याकरिता नेमण्यात आलेल्या सहायक परीरक्षकांना प्रवासादरम्यान जीपीआरएस प्रणाली सुरू ठेवणे आवश्यक करण्यात आले आहे.

टॅग्स :examपरीक्षाMaharashtraमहाराष्ट्रStudentविद्यार्थी