आऱ आऱ पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा
By Admin | Updated: January 18, 2015 00:57 IST2015-01-18T00:57:14+5:302015-01-18T00:57:14+5:30
राज्याचे माजी गृहमंत्री आऱआऱ पाटील यांच्यावर तोंडाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत़
आऱ आऱ पाटील यांच्या प्रकृतीत सुधारणा
मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री आऱआऱ पाटील यांच्यावर तोंडाच्या कॅन्सरची शस्त्रक्रिया करण्यात आली असून, त्यांच्यावर लिलावती हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत़ त्यांची प्रकृती सुधारत असून, भेटीसाठी गर्दी करु नये, असे आवाहन त्यांची कन्या स्मिता पाटील यांनी केले आहे़
काही दिवसांपूर्वी तोंडात झालेल्या गाठीवर मुंबईतील ब्रीच कॅण्डी हॉस्पिटल येथे शस्त्रक्रिया करण्यात आली होती़ त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना लीलावती हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले़ मोठ्या प्रमाणावर लोक भेटीला येत होते़ त्यामुळे त्यांना इन्फेक्शन झाले़ परिणामी त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले़ त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक उपचार करत आहे़ उपचाराला ते प्रतिसाद देत असल्याचे इस्पितळाच्या सूत्रांनी सांगितले़ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, माजी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खा़ सुप्रिया सुळे हे तिघेही डॉक्टरांच्या संपर्कात असल्याचे सांगण्यात
आले़ (विशेष प्रतिनिधी)