छगन भुजबळांच्या प्रकृतीत सुधारणा

By Admin | Updated: April 22, 2016 03:42 IST2016-04-22T03:42:58+5:302016-04-22T03:42:58+5:30

माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना छातीत दुखू लागल्याने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता

Improvement in the health of Chagan Bhujbal | छगन भुजबळांच्या प्रकृतीत सुधारणा

छगन भुजबळांच्या प्रकृतीत सुधारणा

मुंबई: माजी बांधकाममंत्री छगन भुजबळ यांना छातीत दुखू लागल्याने सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर त्यांना रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात हलविण्यात आले आहे. भुजबळ यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे सेंट जॉर्ज रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागाचे प्रमुख डॉ.रोहन सिक्वेरा यांनी सांगितले.
भुजबळ यांच्या वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल अजून आले नसल्याने तोपर्यंत त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात येईल, अशी माहिती डॉ.सिक्वेरा यांनी दिली. भुजबळ यांच्या २ डी इकोसह अन्य काही चाचण्या जे.जे. रुग्णालयाच्या चमूने केल्या. या चाचणीचा
अहवाल अद्याप प्राप्त झाला नसल्याचे जे.जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. तात्याराव लहाने यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Improvement in the health of Chagan Bhujbal