भवरलालजी जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा

By Admin | Updated: January 28, 2016 17:43 IST2016-01-28T17:40:45+5:302016-01-28T17:43:12+5:30

प्रसिद्ध उद्योगपती श्री. भवरलालजी जैन यांना काल सकाळी वर्टीगोचा तीव्र अॅटॅक आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी डॉ. मुन्सी, डॉ. सुभाष चौधरी व डॉ. अजित गोयंका

Improvement in the health of Bhavarlalji Jain | भवरलालजी जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा

भवरलालजी जैन यांच्या प्रकृतीत सुधारणा

>ऑनलाइन लोकमत
जळगाव, दि. २८ - प्रसिद्ध उद्योगपती श्री. भवरलालजी जैन यांना काल सकाळी वर्टीगोचा तीव्र अॅटॅक आल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी डॉ. मुन्सी, डॉ. सुभाष चौधरी व डॉ. अजित गोयंका यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबईला एअर एम्ब्युलन्सद्वारे हलविण्यात आलं.
 
आता त्यांची प्रकृती उत्तम असल्याचे त्यांचे पुत्र अशोक जैन यांनी स्पष्ट केले आहे. त्यांना उत्तम प्रकृती स्वास्थ्य लाभून ते पुनश्च तशाच जोमाने, उत्साहाने आपणा सर्वांच्या मार्गदर्शनार्थ लवकरात लवकर कार्यरत होवोत, अशी प्रार्थनाही त्यांनी केली आहे. 
 

Web Title: Improvement in the health of Bhavarlalji Jain