बाळासाहेब विखे यांच्या प्रकृतीत सुधारणा
By Admin | Updated: November 24, 2014 03:06 IST2014-11-24T03:06:10+5:302014-11-24T03:06:10+5:30
माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर लवकरच ते रुग्णालयातून घरी येणार आहेत,

बाळासाहेब विखे यांच्या प्रकृतीत सुधारणा
अहमदनगर : माजी केंद्रीय मंत्री बाळासाहेब विखे पाटील यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा झाली आहे. उपचार पूर्ण झाल्यानंतर लवकरच ते रुग्णालयातून घरी येणार आहेत, अशी माहिती विखे यांच्या कुटुंबातील सूत्रांनी दिली.
विखे पाटील यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे पुणे येथील रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांनी उपचारांना चांगला प्रतिसाद दिला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत त्यांना रुग्णालयातून सुटी मिळेल. त्यानंतर ते लोणी येथील त्यांच्या निवासस्थानी विश्रांतीसाठी येतील, असे सूत्रांनी सांगितले. (प्रतिनिधी)