सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत सुधारणा

By Admin | Updated: August 28, 2016 03:13 IST2016-08-28T03:13:08+5:302016-08-28T03:13:08+5:30

कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत काही तपासण्या झाल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात येईल

Improve in Sadbhau Khot's Health | सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत सुधारणा

सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत सुधारणा

मुंबई : कृषी व पणन राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत काही तपासण्या झाल्यावर त्यांना डिस्चार्ज देण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
खोत यांच्यावर सांगलीच्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर त्यांच्या पोटात दुखू लागले होते. त्यामुळे पुढील उपचारांसाठी त्यांना मुंबईला हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, भाटे यांना शुक्रवारी दुपारी लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. शुक्रवारी रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्या प्राथमिक तपासण्या करून औषधोपचार सुरू करण्यात आले, त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Improve in Sadbhau Khot's Health