डाळीच्या साठेबाजांवर छापे, हे तर नाटक...

By Admin | Updated: November 6, 2015 01:35 IST2015-11-06T01:35:37+5:302015-11-06T01:35:37+5:30

राज्यात सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांकरवी डाळीची कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेची लूट करायची आणि मग धाडीचे नाटक करून जनतेला दिलासा देत असल्याचा देखावा करायचा,

Impressions on pulses stock, this drama ... | डाळीच्या साठेबाजांवर छापे, हे तर नाटक...

डाळीच्या साठेबाजांवर छापे, हे तर नाटक...

मुंबई : राज्यात सणासुदीच्या तोंडावर व्यापाऱ्यांकरवी डाळीची कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेची लूट करायची आणि मग धाडीचे नाटक करून जनतेला दिलासा देत असल्याचा देखावा करायचा, हे तर भाजपाचे पूर्वनियोजित नाटक आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली. राज्यातील भाजपा सरकारने मोठा डाळ घोटाळा केल्याचा आरोपही त्यांनी केला.
भाजपाच्या पाठीराखे असणाऱ्या व्यापाऱ्यांना लाभ पोहोचविण्यासाठी त्यांना डाळींचा साठा करू द्यायचा, भाववाढ करून जनतेची लूट करायची, मग जनतेत रोष निर्माण झाल्यावर त्याच व्यापाऱ्यांवर धाडीचा दिखावा करायचा, हे सर्व भाजपा सरकारचे नाटक आहे.
सरकारने ज्या व्यापाऱ्यांच्या डाळींच्या साठ्यावर धाडीची कारवाई करून ती जप्त केली, त्या डाळीच्या साठ्याचा जाहीर लिलाव न करता,
ती डाळ पुन्हा कमी दरात विकण्याच्या नावाखाली त्याच व्यापाऱ्यांना
परत का देण्यात आली?
ज्या व्यापाऱ्यांनी डाळीचा कृत्रिम
साठा केला, त्यांच्यावर मोक्का व एमपीडीए लावणार अशी घोषणा सरकारने केली होती, परंतु
प्रत्यक्षात मात्र कसलीही कारवाई का झाली नाही, असा सवाल मलिक यांनी उपस्थित केला. (विश्ोष प्रतिनिधी)

Web Title: Impressions on pulses stock, this drama ...