शहरं
Join us  
Trending Stories
1
"होय, मी चुकलो! आता प्रायश्चित्त म्हणून..."; भाजपाचे संबित पात्रा यांनी मध्यरात्री पोस्ट केला व्हिडीओ
2
वरळीतील शिवसैनिकाचा मृत्यू, अरविंद सावंत संतापले; निवडणूक आयोगाला धरलं जबाबदार
3
भटकता आत्मा, मोदींची ऑफर अन् बिनशर्त पाठिंबा; लोकसभा निवडणुकीचा फड राज्यात गाजला
4
चूक कोणाची? पोर्शे कंपनीची की आरटीओची? ती कार नोंदणी न करताच रस्त्यावर धावत होती
5
"सचिनच्या जाहिरातीमुळे त्याच्या सुरक्षारक्षकाचा जीव गेला"; गंभीर आरोप करत बच्चू कडूंचा आंदोलनाचा इशा
6
गुरुवारी ‘हे’ स्तोत्र म्हणा, गुरुबळ मिळवा; धनवृद्धी, सुख-समृद्धी योग शक्य, होईल गुरुकृपा!
7
एक राजयोग, चौपट लाभ: ६ राशींची इच्छापूर्ती, सरकारी कामात यश; व्यापारात नफा, प्रमोशन शक्य!
8
'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन! पण महेश मांजरेकर नाही तर 'हा' अभिनेता करणार होस्ट
9
काय आहे F&O ट्रेडिंग, किरकोळ गुंतवणूकदारांच्या वाढत्या संख्येबाबत सरकार का देतेय इशारा?
10
आमिर खान नाही तर सलमान खान होता 'गजनी'साठी पहिली पसंती, या कारणामुळे भाईजानचा पत्ता झाला कट
11
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
12
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
13
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
14
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
15
कार्तिक आर्यनसोबत हेमांगी कवी शेअर करणार स्क्रीन; 'चंदू चॅम्पियन'मध्ये साकारतेय महत्त्वाची भूमिका
16
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
17
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
18
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
19
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
20
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?

Shivjayanti: शिवप्रेमींनो, १९ फेब्रुवारीला शिवजयंतीनिमित्त शिवनेरी किल्ल्यावर जाताय, तर खबरदार!

By प्रविण मरगळे | Published: February 17, 2021 10:32 AM

Imposed Section 144 at Shivneri Fort on Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti: छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात, राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिवजयंती साजरी करण्याबाबत ठाकरे सरकारची नियमावली शिवजयंती साध्या पद्धतीने साजरी करा, शिवनेरी किल्ल्यावर गर्दी करू नका मोजक्या लोकांच्या उपस्थितीत शिवनेरीवर शिवजयंती साजरी होणार

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या शिवजयंती(Shivjayanti) कार्यक्रमासाठी सरकारने विशेष खबरदारी घेतली आहे, महाराष्ट्र सरकारनं(Maharashtra government) नियमावली काढून शिवभक्तांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत, यात शिवजयंतीला कोणतीही मिरवणूक काढता येणार नाही असं सरकारनं सांगितल्यामुळे शिवप्रेमींमध्ये नाराजी होती. त्यातच आता सरकारने शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमींनी जमू नये यासाठी कलम १४४ लागू केला आहे. (Section 144 Imposed at Shivneri Fort on 19th Feb Shivjayanti Programme)

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त दरवर्षी शिवनेरी किल्ल्यावर अनेक शिवप्रेमी जमत असतात, राज्यभरातून शिवज्योत घेऊन शिवभक्त शिवनेरी किल्ल्यावर जातात. मात्र यंदा कोरोनामुळे सरकारने किल्ल्यावर जास्त गर्दी होऊ नये यासाठी तयारी केली आहे, काही मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत शिवनेरी शिवजंयती उत्सव साजरा केला जाणार आहे, त्यामुळे शिवप्रेमींनी गर्दी करू नका असं आवाहन स्थानिक आमदार अतुल बेनके यांनी शिवप्रेमींना केलं आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वाभिमान-अभिमान नसलेली शिवसेना

शिवसेना आणि हिंदुत्वाचा आता संबंध उरला नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अभिमान-स्वाभिमान नसलेली शिवसेना आहे. बाळासाहेबांच्यावेळी वेगळी शिवसेना(Shivsena) होता, आता संजय राठोड यांच्या समर्थनार्थ मोर्चाला परवानगी दिली जाते. आदित्य ठाकरेंच्या समर्थनार्थ मोर्चा निघतो, त्याला परवानगी मिळते. मग शिवजयंतीला परवानगी का मिळत नाही असा सवाल भाजपा खासदार नारायण राणेंनी(BJP Narayan Rane) उपस्थित केला आहे. तसेच शिवसेनेच्या सत्तेत साधू-संतांच्या आणि शिवाजी महाराजांच्या मिरवणुकांना बंदी, पण गुंडांच्या मिरवणूकांना परवानगी आहे, असे म्हणत राणेंनी ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

नियमावली वेळीच बदला, अन्यथा...

शिवजयंती हा आपला वर्षातील सर्वात मोठा सण. ज्या छत्रपती शिवाजी महाराजांमुळे आपण आहोत त्यांची जयंती साजरी करतांना कसली बंधने टाकताय. आजान स्पर्धा भरविणारे, बारची वेळसारखी वाढवून देणारे, विविध निवडणुकीत कोरोना नियमाची पायमल्ली चालते आणि शिवजयंती(Shiv Jayanti)ला नियमावली असा प्रश्न मनसेने उपस्थित केला आहे. त्याचसोबत आपल्या महाराष्ट्रात शिवजयंती साजरी करणार नाही तर काय टिपू सुलतानची साजरी करणार का? वेळीच ही नियमावली बदला, जनतेला गृहीत धरू नका असा थेट इशाराच मनसे नेते बाळा नांदगावकर(MNS Bala Nandgoankar) यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेनेला(Shivsena) आणि राज्य सरकारला दिला आहे.

काय आहेत मार्गदर्शक सूचना? (Rules for Shivjayanti Celebration in Maharashtra)

१) अनेक शिवप्रेमी किल्ला शिवनेरी अथवा गड/किल्ल्यांवर जाऊन तारखेनुसार दि. १८ फेब्रुवारी रोजीच्या मध्यरात्री १२ वाजता देखील एकत्र येऊन शिवजयंती साजरी करतात. परंतु यावर्षी covid-19 चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी मोठ्या प्रमाणात एकत्र न येता साधेपणाने शिवजयंती उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे.

२) दरवर्षी शिवजयंती साजरी करताना संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. परंतु यावर्षी कोणत्याही प्रकारे सार्वजनिक ठिकाणी पोवाडे, व्याख्यान, गाणे, नाटक इत्यादींचे सादरीकरण अथवा इतर सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येऊ नये. त्याऐवजी सदर कार्यक्रमाचे केबल नेटवर्क अथवा ऑनलाइन प्रक्षेपण उपलब्ध करुन देण्याबाबत व्यवस्था करण्यात यावी.

३) कोणत्याही प्रकारे प्रभात फेरी, बाईक रैली, मिरवणुका काढण्यात येऊ नयेत. त्याऐवजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अथवा प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्याचा कार्यक्रम आयोजित करुन त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सींगचे पालन करून फक्त १०० व्यक्तींच्या उपस्थितीत शिवजयंती साजरी करण्याची परवानगी देण्यात येत आहे.

४) शिवजयंतीच्या दिवशी आरोग्यविषयक उपक्रम/शिमिरे (उदा. रक्तदान) आयोजित करण्यास प्राधान्य देण्यात याचे आणि त्याद्वारे कोरोना, मलेरिया, डेंग्यू इत्यादी आजार आणि त्यांचे प्रतिबंधात्मक उपाय तसेच स्वच्छता याबाबत जनजागृती करण्यात यावी.

५) आरोग्य विषयक उपक्रमांचे आयोजन करताना त्या तिकाणी सोशल डिस्टन्सींग तसेच स्वच्छतेचे नियम (मास्क, सैनिटायझर इत्यादी) पाळण्याकडे विशेष लक्ष देण्यात यावे,

६) Covid-19 च्या विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाच्या मदत व पुनर्वसन, आरोग्य, पर्यावरण, वैद्यकीय शिक्षण विभाग तसेच संबंधित महानगरपालिका, पोलीस प्रशासन, स्थानिक प्रशासन यांनी विहित केलेल्या नियमांचे काटेकोर पालन करावे. तसेच या परिपत्रकानंतर व प्रत्यक्ष सण सुरु होण्याच्या मधल्या कालावधीत अजून काही सूचना प्रसिध्द झाल्यास त्यांचे देखील अनुपालन करावे

टॅग्स :ShivjayantiशिवजयंतीShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजSection 144जमावबंदीPoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस