शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

राज्याच्या विकासात महसूल आणि रस्ते विकासाचे महत्त्वाचे योगदान - चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2017 14:42 IST

राज्याच्या विकासात महसूल आणि रस्ते विकास यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.

नागपूर: राज्याच्या विकासात महसूल आणि रस्ते विकास यांचे योगदान महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन महसूल व सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी  केले.राज्य चालविण्यासाठी कराच्या माध्यमातून महसूल गोळा केला जातो. महसूल जमा करण्याची ही पद्धत 5 हजार वर्षांपूर्वीपासून चालू आहे. कुठलेही काम करण्यासाठी सरकारची मंजुरी घ्यावी लागते. कुठलीही परवानगी देताना शासन कायद्यानुसार महसुलाची आकारणी करते. महसूल संबंधीचे कायदे शासनामार्फत करण्यात येतात. हे कायदे लोकांना जाचक वाटू नये, याचा विचार करुन लोकांना काय अडचणी येतात याबाबत विचार होऊन कायदे तयार झाले पाहिजेत. लोकांनी मागणी न करता कायदा होणे अपेक्षित आहे असे पाटील म्हणाले. महाराष्ट्र राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्यावतीने आयोजित केलेल्या संसदीय अभ्यास वर्गात ‘महाराष्ट्राच्या गतिशील पायाभूत विकासात सार्वजनिक बांधकाम व महसूल विभागाचे अमूल्य योगदान’ या विषयावर ते बोलत होते. पाटील पुढे म्हणाले, महसूल यंत्रणेतील प्रत्येक घटकाचा नागरिकांच्या दैनंदिन कामकाजात संबंध येतो. शासनाच्या योजनांची माहिती, लागणारे विविध दाखले, महसूल यंत्रणेमार्फत दिले जातात. जनतेला विविध योजनांची माहिती, दाखले एकाच ठिकाणी मिळावे यासाठी ‘महाराजस्व अभियान’ महसूल यंत्रणेमार्फत राबविण्यात आले. सातबारा ऑन लाईन देण्यात येत आहे.राज्याच्या विकासात रस्त्यांचे योगदान महत्त्वाचे आहे, यादृष्टीने शेताकडे जाणारे लहान रस्ते, मुख्यमंत्री सडक योजने अंतर्गत येणारे रस्ते, ग्रामीण रस्ते, जिल्हा रस्ते, राष्ट्रीय महामार्ग या माध्यमातून राज्यात रस्ते विकसित करण्यात येतात. राष्ट्रीय महामार्गासाठी केंद्र शासनाकडूनही निधी उपलब्ध होत आहे. तसेच रस्ते सुस्थितीत राहण्यासाठी विशेष दक्षता घेण्यात येत असते.विविध प्रकल्प निर्माण करताना या प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या लोकांचे पुनर्वसन करणे तसेच आपत्तीमध्ये सापडलेल्या शेतकरी, नागरिकांना मदत करणे हेही शासनाचे काम असून ते आपत्ती मदत व पुनर्वसन विभागामार्फत करण्यात येते. विविध विभागामार्फत शासकीय योजना राबविण्यात येत आहेत. सर्वच विभागाचे राज्याच्या विकासात योगदान महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटील