शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

पोवाडा व लावणीच्या तालात सांगितले विज्ञानाचे महत्त्व

By admin | Updated: February 6, 2017 02:24 IST

विज्ञानाला समजून घेण्यासाठी कथा, कवितांमधून जी मांडणी झाली ती कमालीची आहे़

जळगाव : विज्ञानाला समजून घेण्यासाठी कथा, कवितांमधून जी मांडणी झाली ती कमालीची आहे़ मराठी भाषेत कुसुमाग्रज, विं़दाक़रंदीकर, बा़सी़मर्ढेकर यांनी कवितांमधून विज्ञान तपासायला लावले़ विज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा मानवी जीवनावर कसा सकारात्मक आणि नकारात्मक परिणाम होत यावर साहित्य निर्मिती झाली़ संत एकनाथ महाराज यांनीही भारूडांच्या सहाय्याने सोप्या भाषेत तत्वज्ञान मानवापर्यंत पोहचले़ अशा प्रकारे रविवारी मराठी विज्ञान साहित्य संमेलनात तिसऱ्या सत्रात कविता, कथांमधून वैज्ञानिक साहित्यांवर मान्यवरांनी प्रकाश टाकला़ व्यासपीठावर अध्यक्षस्थानी मुंबई येथील प्रा़शिरीष गोपाळ देशपांडे होते़ अमरावतील येथील मोना चिमोटे, मुंबई येथील कॅप्टन सुनिल सुळे व औरंगाबाद येथील प्रा़यशवंत देशपांडे हे कविता चर्चासत्रात सहभागी झाले होते़ चौघा मान्यवरांनी कविता, कथांच्या माध्यमातून विज्ञान साहित्यांवर विचारमंथन केले़ प्रारंभी मोना चिमोटे यांनी सादरीकरण केले़ कुसुमाग्रज, बा़सी़मर्ढेकर, विं़दाक़रंदीकर यांनी कवितांमधून कशा प्रकारे वैज्ञानिक सकारात्मकता, व वैज्ञाानिक यांत्रिक प्रगती व्यक्त केली आहे, त्यावर चिमोटे यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले़ बा़सी़मर्ढेकर यांच्या कवितांमधून विज्ञानाचा वापर तसेच त्याबद्दल माहिती मिळते़ तसेच त्यांनी विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे मानवी जीवन शब्दांमधून व्यक्त केले आहे़ वि़दाक़रंदीकर यांनीही विश्वरूप, मजूर या कवितांमधून विज्ञानाचा फायदा व तोटा शब्दबध्द करून मांडला असल्याचेही त्यांनी सांगितले़