शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

सहा फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावातच; हायकोर्टाने घातले बंधन; सरकारला निर्देश

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 25, 2025 06:34 IST

गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि माघी गणेश जयंतीवेळी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

मुंबई : आगामी गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि माघी गणेश जयंतीवेळी प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) पासून बनवलेल्या सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करणे बंधनकारक आहे, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.गेल्यावर्षी मुंबई महापालिकेने पाच फूट उंचीच्या १.९५ लाख गणेशमूर्तींसाठी सुमारे २०४ कृत्रिम तलाव तयार केले होते. यात केवळ ८५ हजार मूर्तींचे विसर्जन करण्यात आले तर उर्वरित मूर्तींचे विसर्जन नैसर्गिक जलसाठ्यात  करण्यात आले, याकडे मुख्य न्या. आलोक आराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने लक्ष वेधले. यावर्षी पाच फुटांपर्यंतच्या पीओपी मूर्तींचे कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात येईल, याची काटेकोर अंमलबजावणी होईल, अशी माहिती महाअधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी उच्च न्यायालयाला दिली. मात्र, २१ जुलै रोजी आखलेल्या राज्य सरकारच्या धोरणानुसार, पाच फूट पीओपी मूर्तींचे नैसर्गिक जलसाठ्यात विसर्जन करण्याची परवानगी राज्य सरकारने दिली. मात्र, उच्च न्यायालयाने या धोरणावर असमाधान व्यक्त करत पाचऐवजी सहा फुटांपर्यंतच्या मूर्ती कृत्रिम तलावात विसर्जित करण्याचे आदेश सरकारला दिले. त्यानुसार, धोरणामध्ये सुधारणा करण्याचे निर्देशही राज्य सरकारला दिले.नैसर्गिक जलसाठ्यात पीओपींच्या मूर्तींचे विसर्जन करून पर्यावरणाची होणारी हानी कमी करण्याच्या हेतूने पाच ऐवजी सहा फूट उंचीच्या मूर्तींचेही विसर्जन कृत्रिम तलावात करणे बंधनकारक आहे. या निर्देशांची माहिती सर्व पालिकांना द्यावी, असे उच्च न्यायालयाने स्पष्ट केले. न्यायालयाचे निर्देश असे> २१ जुलैच्या धोरणाचे काटेकोरपणे पालन करावे.> सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना नवीन नियमांबाबत निर्देश द्यावेत.> स्थानिक यंत्रणांनी सार्वजनिक मंडळांना लहान उंचीच्या मूर्ती बसविण्यास प्रोत्साहन द्यावे. > उंच मूर्तींच्या पुनर्वापरातून पुढील वर्षी लहान उंचीच्या गणेशमूर्ती तयार करण्याबाबत त्यांच्यात जागरूकता वाढवावी.> सहा फुटांपर्यंतच्या सर्व मूर्ती कृत्रिम तलावातच विसर्जित होतील, याची खात्री स्थानिक संस्थांनी करावी.> पीओपीचा पुनर्वापर आणि पाण्यात त्याचे जलद विघटन, याचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारने एक तज्ज्ञांची समिती स्थापन करावी.>गणेशोत्सवासह नवरात्रोत्सव आणि माघी गणेश जयंतीसाठीही हे आदेश लागू होतील.  

यंदा १ लाख १० हजार गणेशमूर्तींचे कृत्रिम तलावात विसर्जन करण्यात येणार आहेत. गेल्यावर्षी ३६०८ गणेशमूर्ती दहा फूट व त्यापेक्षा अधिक उंचीच्या होत्या, असेही सराफ यांनी न्यायालयाला सांगितले. त्यावर न्यायालयाने या मूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव निर्माण करणे शक्य आहे का? अशी विचारणा सरकार आणि मुंबई महपालिकेकडे केली. मात्र, असे कृत्रिम तलाव बांधण्यास अनेक अडचणी येतील, असे पालिका आणि सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. पुढील सुनावणी आता आठ आठवड्यांनी होणार आहे.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सवCourtन्यायालय