डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कारवाई करा
By Admin | Updated: January 17, 2017 23:21 IST2017-01-17T23:20:41+5:302017-01-17T23:21:11+5:30
डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कड़क कारवाई करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कणकवली शाखेच्यावतीने एका निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्याकडे

डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करून कारवाई करा
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 17 - डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कड़क कारवाई करावी, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कणकवली शाखेच्यावतीने एका निवेदनाद्वारे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांच्याकडे करण्यात आली आहे.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या कणकवली शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रवीण बिरमोळे, सचिव डॉ.नितिन शेट्ये, डॉ. चं.फ.राणे, डॉ. अनंत नागवेकर, डॉ. विद्याधर तायशेटे, डॉ. प्रशांत मोघे, डॉ.प्रफुल्ल आंबेरकर, डॉ.गीता मोघे, डॉ.प्रीता नायगावकर आदींच्या शिष्टमंडळाने मंगळवारी येथील पोलिस स्थानकात निरीक्षक हेमंतकुमार शहा यांची भेट घेतली, तसेच निवेदन सादर केले.
डॉक्टरांवर हल्ला करणे हा दखलपात्र गुन्हा आहे. या कृत्याचा देशभरातील डॉक्टरांकडून निषेध करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर आम्हीही या कृत्याचा निषेध करीत आहोत. त्यामुळे डॉक्टरांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीला तत्काळ अटक करून त्याच्यावर कड़क कारवाई करण्यात यावी.असे या निवेदनात म्हटले आहे.(प्रतिनिधी)