Maharashtra Politics ( Marathi News ) : शिंदे गटात मंत्रिपदावरुन नाराजी असल्याचे बोलले जात आहे. आमदार दीपक केसरकर यांनाही यावेळी मंत्रिपद मिळालेले नाही. यामुळे केसरकर नाराज असल्याचे बोलले जात होते. दरम्यान, काल त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधत असताना एक मोठं विधान केले आहे. यामुळे आता ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. 'मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले, मला त्यांची कीव येते असं दीपक केसरकर म्हणाले. त्यांच्या या विधानामुळे ते नाराज असल्याचे बोलले जात आहे. काल सिंधुदुर्ग येथे माध्यांसोबत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले.
खर्चाला ‘शिस्तीत’ कात्री, वाटेल ती कामे चालणार नाहीत; पहिल्याच बैठकीत अजित पवारांचे संकेत
आमदार दीपक केसरकर म्हणाले, 'अनेक लोकांनी मला मंत्रिपद मिळू नये म्हणून प्रयत्न केले. त्यांची मला कीव वाटते. माझ मंत्रिपद देव ठरवत असतो. मी कदाचित मंत्र्यांपेक्षाही वरच्या पदावर जाईन. मी साईबाबांचा भक्त आहे. मला पद द्यायला साईबाबा समर्थ आहेत. मंत्रिपद नसल्यामुळे आता मला मोकळा श्वास घेण्याची संधी मिळाली, त्यामुळे मी आनंदात आहे, असंही दीपक केसरकर म्हणाले.
रामटेक बंगल्यावरुन बोलताना केसरकर म्हणाले, रामटेक बंगल्यात जे राहिले ते मुख्यमंत्रिपदापर्यंत पोहचले. शरद पवार, विलासराव देशमुख, शिवाजीराव पाटील निलंगेकर हे सर्व मुख्यमंत्री झाले. आपणही मुख्यमंत्रिपदापेक्षा मोठ्या पदावर जाईन, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
नाणार प्रकल्पावर खासदार नारायण राणे यांनी प्रतिक्रिया दिली होती. यावर आता केसरकर यांनीही मोठं विधान केले आहे. यामुळे आता या दोन्ही नेत्यांमध्ये मतभिन्नता असल्याचे समोर आले आहे. राणे म्हणाले, कंपनी तयार असेल तर रिफायनरी शंभर टक्के होणार, तर दुसरीकडे केसरकर म्हणाले, ही रिफायनरी ‘ग्रीन रिफायनरी’ आहे का हे तपासून पाहावं लागेल. यामुळे महायुतीमध्येच रिफायनरीबाबत वेगवेगळी मत असल्याचे दिसत आहे.
मंत्री उदय सामंत यांनीही नाणार प्रकल्पावर प्रतिक्रिया दिली होती. सामंत म्हणाले, नाणार प्रकल्पावरुन आमच्यात कुठलेही मतभेद नाहीत. चर्चा करून मार्ग सोडवू. नाणारवर लोकांनी निर्णय घ्यावा. २०१९ च्या मुख्यमंत्र्यांनी हा प्रकल्प होणार नाही, असं सांगितलं होत. पण त्यांनी बारसूमध्ये प्रकल्प व्हावा असं पत्र त्यांनी केंद्राला लिहिलं होत. पण सरकार लोकांना विचारून सकारात्मक निर्णय घेईल लोकांमध्ये जाऊन लोकांशी चर्चा करणार, असंही सामंत म्हणाले.