प्रतिमाच्या भावोजीला जामीन नाकारला

By Admin | Updated: February 14, 2015 03:47 IST2015-02-14T03:47:41+5:302015-02-14T03:47:55+5:30

मडगाव : वास्को येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य संशयित प्रतिमा नाईक हिचा भावोजी अभिजित कोरगावकर याने जरी या खून प्रकरणात आपला कुठलाही हात नाही,

The image of the image is denied | प्रतिमाच्या भावोजीला जामीन नाकारला

प्रतिमाच्या भावोजीला जामीन नाकारला

मडगाव : वास्को येथील दुहेरी खून प्रकरणातील मुख्य संशयित प्रतिमा नाईक हिचा भावोजी अभिजित कोरगावकर याने जरी या खून प्रकरणात आपला कुठलाही हात नाही, असा दावा केला तरी उपलब्ध पुराव्यानुसार या संशयिताचाही या प्रकरणाशी संबंध असल्याचे दिसून आले आहे, असा स्पष्ट निष्कर्ष दक्षिण गोव्याच्या प्रधान सत्र न्यायाधीश नूतन सरदेसाई यांनी काढत संशयिताचा जामिनाचा अर्ज फेटाळून लावला.
आतापर्यंत जे पुरावे उपलब्ध झाले आहेत, ते पाहिल्यास या प्रकरणाशी संशयित कोरगावकर याचा कुठलाही संबंध नसल्याचा दावा संशयिताचे वकील राजीव गोमीस यांनी केला असला तरी त्यात तथ्य वाटत नाही. या खून प्रकरणात प्रतिमा हिचा हात असल्याचे प्रथमदर्शनी पुराव्यावरून स्पष्ट झाले आहे. अशा परिस्थितीत संशयित कोरगावकर याला जामीन दिल्यास एकूणच तपासावर त्याचा परिणाम होऊ शकतो, असे नमूद करत न्या. सरदेसाई यांनी हा अर्ज फेटाळला.
नाईक सासू-सुनेच्या हत्या प्रकरणाची आपल्याला कुठलीही माहिती नाही, असा दावा या प्रकरणाची संशयित असलेली प्रतिमा नाईक हिचा भावोजी अभिजित कोरगावकर हा करीत असला तरी त्याच्याकडून पोलिसांनी काही वस्तू जप्त केल्या आहेत. त्यात, गळा आवळण्यासाठी वापरलेल्या नायलॉनच्या दोरीबरोबरच झोपेच्या गोळ्यांची पावडर सापडल्याची माहिती सरकारी वकील सरोजिनी सार्दिन यांनी बुधवारी न्यायालयाला दिली होती.
वास्को पोलिसांच्या तपासाप्रमाणे ज्या रात्री प्रतिमाने हे दोन खून केले, त्या रात्री सुमारे १.३० वाजण्याच्या सुमारास प्रतिमाने अभिजितला बोलावून घेतले. त्यापूर्वी घरातील सर्व दागिने, रोख रक्कम, ज्या नायलॉन दोरीने तिने आपल्या सासूचा गळा आवळला होता ती दोरी, त्या दोघांनाही बेशुध्द करण्यासाठी जेवणात मिसळण्यासाठी तयार केलेली झोपेच्या गोळ्यांची पावडर, या कारस्थानासाठी नव्याने विकत घेतलेला मोबाईल फोन हे सर्व प्रतिमाने एका पॅम्परच्या पिशवीत घालून ती पिशवी घराबाहेर थांबलेल्या अभिजितकडे दिली होती. अभिजितने ही पिशवी आपल्या ड्युओ स्कुटरमध्ये ठेवली होती. सुरुवातीला पोलिसांनी प्रतिमाच्या घरी फक्त स्वत:ला जखमी करण्यासाठी वापरलेला सुरा सापडला होता. मात्र, नंतर पोलिसांच्या दबावापुढे प्रतिमा धडाधड बोलू लागली, त्या वेळी तिने हे सर्व सामान अभिजितकडे असल्याचे सांगितले आणि पोलिसांनी त्या ड्युओ स्कुटरसह सर्व सामान अभिजितकडून ताब्यात घेतले होते.
(प्रतिनिधी)

Web Title: The image of the image is denied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.