शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
3
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
4
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
5
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
6
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
7
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
8
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
9
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
10
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
11
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
12
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
13
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
14
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
15
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
16
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
17
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
18
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
19
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला

'मी तुम्हाला घाबरावयाला आलो नसून जागं करायला आलोय'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 18, 2019 23:13 IST

माझा वसंत मोरे तुम्हाला जे जे वचन देईल, ते वचन तो निवडून आल्यावर पाळेल याची मला खात्री आहे

पुणे - महाराष्ट्रातल्या शहरांना आकार-उकार राहिलेला नाही. सगळ्या शहरांमध्ये बजबजपुरी झाली आहे. बाहेरच्या राज्यातून लोक येत आहेत. आज देशात सर्वाधिक कर महाराष्ट्र भरत आहे आणि  बाहेरचे लोकही पोसत आहे अशा शब्दात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुण्यातील सभेत परप्रांतियांचा मुद्दा पुन्हा एकदा छेडला. कोथरूड येथील मनसेचे उमेदवार किशोर शिंदे यांच्या प्रचारसभेनंतर राज यांनी हडपसर येथे प्रचारसभा घेतली. 

माझा वसंत मोरे तुम्हाला जे जे वचन देईल, ते वचन तो निवडून आल्यावर पाळेल याची मला खात्री आहे. माझा उमेदवार वसंत मोरे देणारा आहे, हडप करणारा नाहीय. एका चांगल्या भवितव्यसाठी आणि सबळ विरोधीपक्षासाठी माझ्या उमेदवारांना निवडून द्या, असे आवाहन राज यांनी हडपसर येथील सभेत केले. जर बदल घडवायचा असेल तर अशी माणसं विधानसभेत हवी ज्यांना तुमच्याबद्दल तळमळ आहे आणि काही करून दाखवण्याची धमक आहे, मला अभिमान आहे, अशी माणसं माझ्याकडे आहेत. माझ्या उमेदवारांच्या मनात आणि पोटात आग आहे,त्यांना तुमच्यासाठी काहीतरी करायचं आहे, त्यांना तुमच्यासाठी लढायचं आहे. माझ्या वसंत मोरेने नगरसेवक म्हणून जे काम केलं आहे, ते काम पुण्यात कुठेही झालं नसेल, असे राज म्हणाले.  

शिवसेना म्हणते 10 रुपयात जेवण देऊ तर भाजप म्हणतंय की, आम्ही 5 रुपयात जेवण देऊ. शिवसेना भाजप युतीत आहे, पण आश्वासन देण्यापुरतं, ह्यांच्यात पायपोस नाही. सत्ताधाऱ्यांच्या डोक्यात सत्तेची हवा गेली आहे आणि त्यांच्यावर जर अंकुश ठेवणारा विरोधी पक्ष नसेल तर तुमच्यावर वरवंटा फिरला म्हणून समजा. मतदानाच्या आधल्यादिवशी कोण किती पैसे वाटतोय, कोण जेवणावळी घालतोय, कोण कोणाच्या नात्यातला जातीतला आहे, यावरुन आपण मतदान करतोय, म्हणून आपला विकास होत नाही. या निवडणुकीच्या वेळेस तरी याचा विचार करणार आहात का? मी एका गोष्टीची वारंवार आठवण करून देत आहे की; देशात आर्थिक मंदीचं सावट आहे आणि त्याचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसतोय आणि बसेल. लक्षात ठेवा की मी तुम्हाला घाबरावयाला किंवा विरोधाला विरोध करायला म्हणून हे सांगत नाही. मी तुम्हाला जागं करायचा प्रयत्न करतोय, असे सांगत भावनिक आवाहनही राज यांनी केलं.  

टॅग्स :Raj Thackerayराज ठाकरेPuneपुणेMNSमनसेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा