मीच माझा आवडता व्यंगचित्रकार

By Admin | Updated: January 28, 2015 01:09 IST2015-01-28T01:09:22+5:302015-01-28T01:09:22+5:30

‘कॉमन मॅन’ म्हटला की डोळ्यासमोर येतो तो नेहमी एखाद्या कोपऱ्यात बुजरेपणाने उभा असलेला, थोडासा घाबरलेला, तणावाखाली असलेला अन् सर्व मुकाटपणे सहन करणारा गर्दीतील एक चेहरा.

I'm my favorite cartoonist | मीच माझा आवडता व्यंगचित्रकार

मीच माझा आवडता व्यंगचित्रकार

नागपूरकरांनी अनुभवलेले निर्भीड ‘आर.के.’: लक्ष्मणरेषेच्या पलीकडचा ‘कॉमन मॅन’
नागपूर : ‘कॉमन मॅन’ म्हटला की डोळ्यासमोर येतो तो नेहमी एखाद्या कोपऱ्यात बुजरेपणाने उभा असलेला, थोडासा घाबरलेला, तणावाखाली असलेला अन् सर्व मुकाटपणे सहन करणारा गर्दीतील एक चेहरा. परंतु या चेहऱ्याला कोट्यवधी वाचकांच्या मनात अढळपद देणारे कुंचल्याचे किमयागार आर.के.लक्ष्मण यांच्यात दडलेला ‘कॉमन मॅन’ अनुभवण्याची संधी नागपूरकरांना अनेकदा मिळाली. प्रत्येकवेळी पहायला मिळाले ते लक्ष्मणरेषेच्या पलीकडचे निर्भीड व्यक्तिमत्त्व, कमालीचे कसब असणारा एक हरहुन्नरी कलाकार. भल्याभल्या राजकारण्यांना बारीक चिमटे काढून घायाळ करणाऱ्या ‘आर.के.’ यांना राजकारणात अजिबात रस नव्हता हे ‘टॉप सिक्रेट’देखील त्यांनी उपराजधानीत ‘शेअर’ केले होते.
जब तक है जान...
१९९३ मध्ये ‘एमटीडीसी’तर्फे त्यांचा ताडोबा, रामटेक, खिंडसी तसेच विदर्भातील काही ठिकाणांवर दौरा आयोजित करण्यात आला असताना त्यांनी नागपूरकरांशी संवाद साधला होता. त्यावेळी व्यंगचित्रांच्या दुनियेत येऊन त्यांना ४५ हून अधिक वर्षे झाली होती अन् ‘मॅगसेसे’सह असंख्य पुरस्कार त्यांना मिळाले होते. परंतु तरीदेखील मी सर्वोत्तम व्यंगचित्र अजून काढलेच नाही असे मत त्यांनी प्रांजळपणे व्यक्त केले होते. व्यंगचित्रामधील ‘कॉमन मॅन’ला मी मुळीच शोधलेले नाही. उलट त्यानेच माझा शोध घेतला अन् जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत ‘कॉमन मॅन’ला साकारत राहील हे त्यांचे शब्द आजदेखील नागपूरकरांच्या कानामध्ये ताजे आहेत.

Web Title: I'm my favorite cartoonist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.