अवैध औषधीसाठा बाळगला; न्यायालयात खटला दाखल

By Admin | Updated: June 7, 2016 07:32 IST2016-06-07T07:32:03+5:302016-06-07T07:32:04+5:30

उस्मानाबाद : अन्न व औषध प्रशासनाच्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी कळंब शहरात ६६ हजाराचा अवैध औषधी साठा जप्त केला होता़

Illegal medicine store; File filed in court | अवैध औषधीसाठा बाळगला; न्यायालयात खटला दाखल

अवैध औषधीसाठा बाळगला; न्यायालयात खटला दाखल

उस्मानाबाद : अन्न व औषध प्रशासनाच्या अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांनी कळंब शहरात ६६ हजाराचा अवैध औषधी साठा जप्त केला होता़ या प्रकरणाच्या तपासानंतर संबंधित इसमाविरुद्ध कळंब येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला आहे़ तर मागील महिन्यात नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दोन औषध विक्रेत्यांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत़ तर पाच जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे़
अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने मागील काही वर्षांपासून औषध दुकानांची तपासणी आणि त्रुटी आढळल्यानंतर करण्यात येणाऱ्या कारवाईला वेग आला आहे़ अन्न सुरक्षा आयुक्त काळे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्नसुरक्षा अधिकारी सुनील गवळी यांनी मागील वर्षी १५ आॅक्टोबर रोजी कळंब शहरात अवैधरित्या औषध साठा बाळगणाऱ्या नजीर मजीद काझी याच्याविरुद्ध कारवाई केली होती़ या कारवाईदरम्यान ६६ हजार रूपयांचा औषधासाठा जप्त करण्यात आला होता़ कारवाईनंतर या प्रकरणाचा तपास अन्नसुरक्षा अधिकारी सुनील गवळी यांनी केला़

Web Title: Illegal medicine store; File filed in court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.