शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बेकायदेशीर लॉटरी, जुगार, वेश्या व्यावसायिकांना 'एमपीडीए'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2018 03:41 IST

महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीर लॉटरी, जुगार केंद्र चालविणारे, वेश्या व्यवसाय करणारे तसेच मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्तींविरोधात 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

- योगेश पांडेनागपूर : महाराष्ट्र राज्यात बेकायदेशीर लॉटरी, जुगार केंद्र चालविणारे, वेश्या व्यवसाय करणारे तसेच मानवी अपव्यापार करणाऱ्या व्यक्तींविरोधात 'एमपीडीए'अंतर्गत कारवाई करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात विघातक कृत्यांना प्रतिबंधघालण्याबाबत अधिनियम, १९८१ मध्ये सुधारणा विधेयक विधान परिषदेने शुक्रवारी मंजूर केले.गृहराज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी सभागृहासमोर गुरुवारी रात्री हे सुधारणा विधेयक मांडले. महाराष्ट्र विघातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियमात झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधद्रव्यविषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, व्हिडीओ पायरसी, वाळू तस्करी, अत्यावश्यक वस्तूंचा काळा बाजार यांचा समावेश आहे. या विधेयकात सुधारणा करण्यासाठी शासनाने हे विधेयक मांडले. महाराष्ट्र राज्याला कायदेशीर लॉटरीपासून मोठ्या प्रमाणावर महसूल प्राप्त होतो. मात्र बेकायदेशीर लॉटरी केंद्र व जुगार केंद्रांमुळे राज्याच्या महसुलात तूट येत आहे. यामुळे सार्वजनिक सुव्यवस्थेलादेखील बाधा पोहोचत आहे. सोबतच वेश्या व्यवसाय करणे, सक्तीने विवाह करणे, वेठबिगार, अवयव प्रत्यारोपण, भीक मागणे यासाठी मानवी अपव्यापार तसेच तस्करी करण्याच्या कामात गुंतलेल्या समाजविघातक व्यक्तींमुळे समाजाला धोका उत्पन्न होत आहे. तसेच सार्वजनिक सुव्यवस्थेवर प्रतिकूल परिणाम होत आहे. या सर्व व्यवसायातून मोठ्या प्रमाणात काळा पैसा निर्माण होतो. त्यामुळे आशा व्यक्तींविरोधात कडक कारवाई होणे आवश्यक आहे. त्यामुळेच यांना विघातक कृत्यांना आळा घळण्याबाबतच्या अधिनियमाच्या कक्षेत आणण्याची आवश्यकता आहे, अशी भूमिका डॉ.पाटील यांनी मांडली. या बेकायदेशीर व्यवसायांमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींच्या प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेसाठी, महसुलाची हानी टाळण्यासाठी व सार्वजनिक सुव्यवस्था राहावी यासाठी अधिनियमातील तरतुदींचा उपयोग होईल. यासाठीच ही सुधारणा करण्यात येत आहे, असेदेखील ते म्हणाले. या विधेयकावर किरण पावसकर, हरिभाऊ राठोड, राहुल नार्वेकर यांनी उपसूचना सुचविल्या. हातभट्टीवाल्यांना या अधिनियमातून दूर ठेवावे अशी मागणी राठोड यांनी केली.>यांच्यावर होणार 'एमपीडीए' अंतर्गत कारवाईबेकायदेशीर जुगार अड्डे चालवणारेबेकायदेशीर लॉटरी तिकिटांची विक्री करणारेबेकायदेशीर लॉटरीसंबंधात काम करणारेवेश्या व्यवसाय करणारे किंवा करवून घेणारेसक्तीने विवाह लावणारेवेठबिगारी करवून घेणारेभीक मागण्यासाठी मानवी तस्करी करणारे

टॅग्स :nagpurनागपूरNagpur Monsoon Session 2018नागपूर पावसाळी अधिवेशन २०१८