राजकारण्यांना भोवले अवैध होर्डिंग्ज

By Admin | Updated: March 13, 2015 05:34 IST2015-03-13T05:34:40+5:302015-03-13T05:34:40+5:30

न्यायालयाला हमी दिल्यानंतरही अवैध होर्डिंग्ज् झळकवणाऱ्या राजकीय पक्षांना उच्च न्यायालयाने गुरुवारी चांगलेच धारेवर धरले़ मनमानी करणाऱ्या भाजपा, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसवर

Illegal hoards of politicians | राजकारण्यांना भोवले अवैध होर्डिंग्ज

राजकारण्यांना भोवले अवैध होर्डिंग्ज

मुंबई : न्यायालयाला हमी दिल्यानंतरही अवैध होर्डिंग्ज् झळकवणाऱ्या राजकीय पक्षांना उच्च न्यायालयाने गुरुवारी चांगलेच धारेवर धरले़ मनमानी करणाऱ्या भाजपा, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसवर न्यायालयाच्या अवमानतेची कारवाई का करू नये? अशी नोटीसच न्यायालयाने या पक्षांना धाडली असून, याचे प्रत्युत्तर येत्या ७ मेपर्यंत देण्याचे आदेशही दिले आहेत़
भाजपासाठी मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार, मनसेसाठी बाळा नांदगावकर व राष्ट्रवादी काँग्रेससाठी शिवाजी गजरे यांना नोटीस जारी करण्यात आली आहे़
मुंबईसह इतर शहरे व जिल्ह्यांमध्ये लागणाऱ्या अवैध होर्डिंग्ज्विरोधात डझनभर याचिका न्यायालयात दाखल झाल्या आहेत़ त्यावरील सुनावणीत न्यायालयाने राजकीय पक्षांना कानपिचक्या देत स्वत:हून बेकायदा होर्डिंग्ज् लावू नका, असे बजावले होते़ त्यानंतर जागे झालेल्या भाजपा, मनसे व राष्ट्रवादी काँग्रेसने गेल्या वर्षी अवैध होर्डिंग्ज् न लावण्याची हमी प्रतिज्ञापत्रावर दिली होती. मंजुरीशिवाय होर्डिंग्ज् लावणार नाही व तसे आदेश प्रत्येक कार्यकर्त्याला देऊ, असेही या तिन्ही पक्षांनी स्पष्ट केले होते़ मात्र ही हमी दिल्यानंतरही या पक्षांचे बेकायदा होर्डिंग्ज् झळकत असल्याचा मुद्दा न्या़ अभय ओक व न्या़ अनिल मेनन यांच्या खंडपीठाने गुरुवारी स्वत:हून उपस्थित केला़ हमी दिल्यानंतरही राजकीय पक्षांनी बेकायदा होर्डिंग्ज् लावणे गैर असल्याचे त्यांनी सुनावले. (प्रतिनिधी)

Web Title: Illegal hoards of politicians

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.