‘आयआयएम-नागपूर’कडे अभियंत्यांचाच ओढा
By Admin | Updated: May 7, 2017 04:33 IST2017-05-07T04:33:57+5:302017-05-07T04:33:57+5:30
महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘नागपूर-आयआयएम’ची पहिली ‘बॅच’ बाहेर

‘आयआयएम-नागपूर’कडे अभियंत्यांचाच ओढा
योगेश पांडे/ लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महाराष्ट्रातील पहिले ‘आयआयएम’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट) असलेल्या ‘नागपूर-आयआयएम’ची पहिली ‘बॅच’ बाहेर पडली आहे. दोन वर्षांच्या कालावधीत व्यवस्थापनातील दर्जेदार शैक्षणिक संस्था ठरलेल्या ‘आयआयएम’कडे सर्वांत जास्त ओढा अभियंत्यांचाच राहिला आहे. यातही ‘आयटी’ क्षेत्रातील अनुभवी अभियंत्यांचे प्रमाण सर्वांत जास्त दिसून आले आहे. येत्या काळात हा ‘ट्रेण्ड’ कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयातर्फे घोषणा झाल्यानंतर ‘आयआयएम-नागपूर’चे पालकत्व देशातील अग्रणी व्यवस्थापन संस्था ‘आयआयएम-अहमदाबाद’कडे देण्यात आले आहे व तेथील अनेक प्राध्यापक नागपुरातदेखील धडे
देतात.
साधारणत: व्यवस्थापनाच्या क्षेत्रात वाणिज्य, व्यवस्थापन शाखेतील विद्यार्थी जास्त प्रमाणात प्रवेश घेतात, असा समज आहे.
मात्र ‘नागपूर-आयआयएम’ याला अपवाद ठरले आहे. ‘आयआयएम’च्या दोन्ही ‘बॅच’मधील विद्यार्थ्यांचे ‘प्रोफाईल’ पाहिले असता येथील ९४ टक्के विद्यार्थी हे अभियांत्रिकी पार्श्वभूमीचे असल्याचे स्पष्ट झाले.
२०१५ सालच्या पहिल्या ‘बॅच’मध्ये ५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला होता. यातील ५१ विद्यार्थी हे अभियांत्रिकी पदवीधर होते. तर २०१६-१८ या ‘बॅच’मध्ये प्रवेशित ५६पैकी ५३ (९४.६४%) विद्यार्थी अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. वाणिज्य क्षेत्रातील केवळ २
(३.५७ %) विद्यार्थी असून, एकाने (१.७८ %) ‘सीए’ची परीक्षा उत्तीर्ण केली आहे.
‘आयटी’तील
विद्यार्थ्यांचे प्रमाण जास्त
‘आयआयएम-नागपूर’च्या पहिल्या ‘बॅच’मध्ये ‘आयटी’ क्षेत्रातील अभियंत्यांचे प्रमाण ४० टक्क्यांहून अधिक होते. सध्याच्या ‘बॅच’मध्ये ३२ विद्यार्थी (५७.१४ टक्के) ‘आयटी’ अभियांत्रिकी क्षेत्रातील आहेत. तर उर्वरित २१ विद्यार्थी विविध अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर आहेत.
अनुभवाची टक्केवारी
अनुभव२०१५-१६२०१६-१८
फ्रेशर्स३१ %७.१४ %
० ते २ वर्षे३३ %१७.८६ %
२ ते ३ वर्षे१६ %४२.८६ %
३ वर्षांहून
अधिक२० %३२.१४ %