मनपा दवाखान्यांसाठी औषध खरेदीकडे प्रशासनाचे तसेच वैद्यकीय अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असून औषधांसाठीची निविदा गेल्या दोन वर्षांपासून दिलेली नाही.
औषधी खरेदीकडे दुर्लक्ष
रुग्णांना चार ते पाच हजार रुपये खर्च
मनपा दवाखान्यांची स्थिती : दोन वर्षांपासून निविदाच नाही
जळगाव : मनपा दवाखान्यांसाठी औषध खरेदीकडे प्रशासनाचे तसेच वैद्यकीय अधिकार्यांचे दुर्लक्ष होत असून औषधांसाठीची निविदा गेल्या दोन वर्षांपासून दिलेली नाही. त्यामुळे दरमहा लाख रुपयांची औषधी विनानिविदा खरेदी केली जात असून रुग्णाच्या नातेवाइकांना बहुतांश औषधी बाहेरून औषधी खरेदी करावी लागत आहे. मनपाकडून आर्थिक परिस्थिती ठीक नसतानाही सामान्य जनतेला रुग्णालयांच्या माध्यमातून अल्पदरात सेवा दिली जात असल्याचा दावा केला जात असला तरीही प्रत्यक्षात गोरगरीब जनतेला मात्र ही सेवा अल्पदरात मिळत नसल्याचेच दिसून येत आहे. कारण मनपाच्या शाहू महाराज रुग्णालयासह तीन रुग्णालयांमध्ये सुतिकागृहाची सोय असून तेथे अल्पदरात तपासणी करून प्रसूतीची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र मनपा दवाखाने विभागाचे औषध खरेदीसाठीची निविदाच गेल्या दोन वर्षांपासून निघालेली नाही. त्यामुळे दरमहा एक लाखापर्यंतची औषधी ५00 रुपयांच्या बिलांच्या आधारे खरेदी केली जात आहे. टक्केवारीचा खेळ निविदा न मागविता रोखीने औषध खरेदी केल्यास संबंधिताना ३0 टक्के हिस्सा मिळत असल्यानेच निविदा प्रक्रियेकडे दुर्लक्ष होत असल्याचे समजते. औषधे बाहेरून आणायला सांगितल्यावर रुग्णाचे नातेवाईक व कर्मचारी, डॉक्टरांमध्ये वादही होत असल्याचे समजते. शासनाने मोफत औषध पुरविण्याची तयारी दर्शविली आहे. तसेच जेनेरिक औषधे खरेदी केली तरीही मनपाची मोठय़ा प्रमाणावर आर्थिक बचत होणार आहे. मात्र यासाठी औषधांची यादी तयार करण्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून प्रलंबितच असल्याचे समजते. रुग्णांना चार ते पाच हजार रुपये खर्च मनपाची औषधांसाठी निविदा प्रक्रिया सुरू आहे. आरसीएचसाठी शासनाकडून वर्षभरापूर्वी औषधी मिळाली होती. त्यानंतर सहा महिन्यांपूर्वी आणखी प्रस्ताव पाठविला. मात्र शासनाकडून औषधी मिळालेली नाही. एनयुएचएमअंतर्गत औषधांसाठी प्रस्ताव मागविले आहेत. त्याचे काम सुरू आहे. -डॉ. राम रावलानी,मुख्य वैद्यकीय अधिकारी, मनपा
दरमहा लाखाची औषधी खरेदी केली जात असली तरीही प्रसूतीसाठी दाखल रुग्णाच्या नातेवाइकांना औषधांची यादी हाती सोपवून बाहेरून औषधे विकत आणायला सांगितली जात आहेत. जी औषधी मोफत मिळायला हवी, त्यापोटी चार-पाच हजार रुपये खर्च रुग्णाच्या नातेवाइकांना करावा लागत आहे. मनपा प्रशासन मात्र याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष करीत आहे.