माहिती व संपर्क तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष
By Admin | Updated: December 29, 2014 05:55 IST2014-12-29T05:55:58+5:302014-12-29T05:55:58+5:30
शहरांचा विकास झपाट्याने होत असतानाही राज्यातील महापालिका मात्र माहिती व संपर्क तंत्रज्ञानासाठी (आयसीटी) अंदाजपत्रकात तुटपुंजी तरतूद

माहिती व संपर्क तंत्रज्ञानाकडे दुर्लक्ष
मुंबई : शहरांचा विकास झपाट्याने होत असतानाही राज्यातील महापालिका मात्र माहिती व संपर्क तंत्रज्ञानासाठी (आयसीटी) अंदाजपत्रकात तुटपुंजी तरतूद करीत असल्याचे एका सर्व्हेक्षणातून समोर आले आहे.
‘आयसीटी इन अर्बन गव्हर्नन्स’ याअंतर्गत देशातील ५३ नगरपालिका या सर्व्हेक्षणात सहभागी झाल्या होत्या. त्यात महाराष्ट्रातील पुणे, नागपूर, पिंपरी-चिंचवड, ठाणे आणि नवी मुंबई महानगरपालिकांचा समावेश होता.
नागपूर महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील ०.५ टक्के म्हणजेच ६ कोटी रुपयांची तरतूद अंदाजपत्रकात केली आहे. नवी मुंबई महानगरपालिका सर्वांत जास्त आर्थिक तरतूद करणारी महानगरपालिका ठरली आहे. या महानगरपालिकेने अर्थसंकल्पातील १ टक्का म्हणजे सुमारे २२ कोटी रुपयांची तरतूद केली आहे.
बहुतेक महानगरपालिका सॉफ्टवेअर, मेंटेनन्स, अपग्रेडेशन आणि हार्डवेअरवर त्यांच्या आयटीसी खर्चाच्या ३० टक्क्यांपेक्षाही कमी खर्च करीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (प्रतिनिधी)