पुण्यतिथी दिनी उपेक्षा
By Admin | Updated: November 26, 2014 00:01 IST2014-11-26T00:01:28+5:302014-11-26T00:01:28+5:30
संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या 3क्व्या पुण्यतिथी कार्यक्रमाकडे अनेकांनी आज पाठ फिरविली.

पुण्यतिथी दिनी उपेक्षा
पुणो : संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या 3क्व्या पुण्यतिथी कार्यक्रमाकडे अनेकांनी आज पाठ फिरविली. निमंत्रण पत्रिकेत नावे असलेल्या सर्व आमदार आणि खासदारांचा, नगरसेवकांचा त्यांत समावेश होता. केंद्रीय मंत्री आणि राज्यातील राज्यमंत्री अनुपस्थित राहिलेच; पण महापालिकेतील 2क् निमंत्रकांपैकी फक्त चौघे जण उपस्थित होते.
पुणो महापालिकेने चव्हाण यांच्या शिल्पाचा भूमिपूजन समारंभ सकाळी 1क् वाजता आयोजित केला होता. संचेती रुग्णालयाजवळील नेताजी सुभाषचंद्र बोस चौकात हा पुतळा उभारला जाणार आहे. पुणो महापालिकेने यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या शिल्पाचा भूमिपूजन समारंभ सकाळी दहा वाजता आयोजित केला होता. संसदेचे अधिवेशन सुरू असल्याने प्रकाश जावडेकर उपस्थित राहु शकले नाहीत. तर, समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे हेही काही कारणांनी गैरहजर होते. यशवंतराव चव्हाण यांचे जन्मशताब्दी वर्ष नुकतेच पार पडले असून, त्यांची आज 3क्वी पुण्यतिथी होती. महापौर दत्तात्रय धनकवडे यांच्या हस्ते भूमिपूजनाचा कार्यक्रम झाला. उपमहापौर आबा बागुल यांच्यासह प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्ष कमल व्यवहारे, स्थानिक नगरसेवक बाळासाहेब बोडके, नीलिमा खाडे, माजी नगरसेवक श्रीकांत शिरोळे, नगरसेवक संजय बालगुडे व मुकारी अलगुडे हे उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या महापालिकेने प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेत भाजपच्या सर्व आमदारांची, विधान परिषदेतील आमदारांची तसेच खासदार सुप्रिया सुळे, अनिल
शिरोळे, शिवाजीराव आढळराव-पाटील, वंदना चव्हाण, संजय काकडे, अनू आगा तसेच म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे, माजी आमदार
मोहन जोशी यांची नावे होती.
निमंत्रकांमध्ये बापू कण्रे, सुभाष जगताप, अर¨वंद ¨शंदे, वसंत
मोरे, गणोश बिडकर, अशोक
हरणावळ, सिद्धार्थ धेंडे, विनायक हणमघर, मि¨लंद काची, अनिल
टिंगरे, प्रदीप धुमाळ, नरुद्दीन
सोमजी, रेश्मा भोसले यांची नावे होती. मात्र, त्यांच्यापैकी फक्त 3-4 जण उपस्थित होते. (प्रतिनिधी)
4अत्यंत गजबजलेल्या चौकात यशवंतराव चव्हाण यांचा पुतळा उभारला
जात आहे. या शिल्पाची दिशा पूर्व बाजूला आहे. त्या रस्त्याने एकेरी वाहतूक असल्याने मागून येणा:यांना शिल्प नीट दिसू शकणार नाही. तसेच, अभियांत्रिकी महाविद्यालयासमोरील रस्त्याने येणा:यांची मान पश्चिम दिशेला वळाल्यासच हे शिल्प दिसू शकेल.