इगतपुरी- कसारा रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विलंबाने
By Admin | Updated: July 30, 2014 14:07 IST2014-07-30T13:54:19+5:302014-07-30T14:07:38+5:30
इगतपुरी-कसारा दरम्यानच्या रेल्वेमार्गावर सकाळी ९.३0च्या सुमारास दरड कोसळल्याने नाशिक मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली

इगतपुरी- कसारा रेल्वेमार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक विलंबाने
>नाशिक : इगतपुरी-कसारा दरम्यानच्या रेल्वेमार्गावर सकाळी ९.३0च्या सुमारास दरड कोसळल्याने नाशिक मुंबई दरम्यानची रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली असून तिसर्या मार्गावरून वाहतूक सुरू केली आहे. दरम्यान गोदावरी आणि जनशताब्दी एक्स्प्रेस या गाड्या नाशिकरोडपर्यंत करण्यात आल्या असून त्या तेथूनच परतणार आहेत. तर नाशिक-मुंबई मार्गावरील गाड्या मनमाड-पुणे-कल्याण मार्गे चालवण्यात येत आहेत.
(लोकमत न्यूज नेटवर्क)