यंदाचा इफ्फी आठच दिवसांचा?
By Admin | Updated: June 16, 2016 21:24 IST2016-06-16T21:24:03+5:302016-06-16T21:24:03+5:30
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) कालावधी दहा दिवसांऐवजी आठ दिवस करण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आणला आहे.

यंदाचा इफ्फी आठच दिवसांचा?
ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. 16 - भारतीय चित्रपट महोत्सव संचालनालयाने भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) कालावधी दहा दिवसांऐवजी आठ दिवस करण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आणला आहे. गोवा सरकारला संचालनालयाने हा प्रस्ताव सादर केला असून त्याबाबत शासकीय पातळीवर विचार सुरू आहे, असे सूत्रंनी सांगितले.
दरवर्षी गोवा मनोरंजन संस्था व केंद्र सरकारच्या माहिती व प्रसारण मंत्रलयाच्या सहकार्याने इफ्फी 20 ते 30 नोव्हेंबर या कालावधीत पार पडतो. 2004 पासून हा महोत्सव गोव्यात होत आहे. पूर्वी तो दिल्लीत होत होता. दहा दिवस इफ्फीचे कार्यक्रम लांबविण्याची गरज नाही, त्याऐवजी आठ दिवसांत सोहळा आटोपता घेता येतो, असे चित्रपट महोत्सव संचालनालयाचे मत बनले आहे.