शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

धर्मांतर करायचे असेल तर आधी जिल्हाधिकाऱ्यांना कळवावे लागेल; विधेयक सादर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 07:22 IST

बेकायदेशीर धर्मांतरासाठी कठोर शिक्षा, मदत करणाऱ्यांनाही कारावास

मुंबई : फसवणूक, दबाव, प्रलोभन किंवा लग्नाच्या आश्वासनाद्वारे केलेले धर्मांतर आता बेकायदेशीर ठरवण्यात येणार असून, अशा प्रकरणांमध्ये ७ वर्षांपर्यंत कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंड अशी शिक्षा प्रस्तावित करण्यात आली आहे. राज्य सरकारने धर्मस्वातंत्र्य विधेयकाचा जो मसुदा तयार केला आहे, त्यात बेकायदेशीर धर्मांतराला मदत करणाऱ्यांसाठीही शिक्षेची तरतूद केली आहे. तसेच धर्मांतर करायचे असेल तर आधी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना द्यावी लागणार आहे.

हे विधेयक गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी शुक्रवारी विधानसभेत सादर केले. त्यावर सोमवारी चर्चा होईल. या विधेयकानुसार धर्मांतर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने ६० दिवस आधी जिल्हाधिकाऱ्यांकडे आपला हेतू जाहीर करणे बंधनकारक असेल. धर्मांतर पूर्ण झाल्यानंतर २१ दिवसांच्या आत घोषणापत्र सादर करावे लागेल. सूचना प्राप्त झाल्यानंतर संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय ती सार्वजनिक करेल आणि ३० दिवसांच्या आत हरकती मागवेल. त्यानंतर धर्मांतराचा उद्देश आणि कारणांची पोलिस चौकशी केली जाईल. त्यानंतर उचित कार्यवाही केली जाईल.

धर्मांतर घडवणाऱ्यांवर पुराव्याची जबाबदारी

धर्मांतराच्या प्रक्रियेत सल्ला देणे, प्रोत्साहन देणे, व्यवस्था करणे, कागदपत्रांवर सही करणे किंवा अप्रत्यक्षरीत्या मदत करणे अशा कोणत्याही प्रकारे सहभागी झालेल्या व्यक्तींनाही सहभागी  मानले जाईल आणि त्यांच्यावरही कारवाई होईल.

या प्रकरणांमध्ये धर्मांतर घडवून आणणाऱ्या व्यक्तीवर किंवा संस्थेवरच पुराव्याची जबाबदारी ठेवण्यात आली आहे. विधेयकात असेही नमूद करण्यात आले आहे की बेकायदेशीर धर्मांतराशी संबंधित विवाहातून जन्मलेल्या मुलांची देखभाल आणि पालकत्व पीडित व्यक्तीला दिले जाईल. तसेच अशा प्रकरणांतील पीडितांच्या पुनर्वसनाची जबाबदारी राज्य सरकारवर राहील.

सात वर्षांचा कारावास, एक लाखाचा दंड

साध्या प्रकरणात सात वर्षांपर्यंत कारावास आणि एक लाख रुपयांपर्यंत दंड

महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा मानसिकदृष्ट्या असमर्थ व्यक्तींच्या बाबतीत : सात वर्षांपर्यंत कारावास आणि पाच लाख रुपयांपर्यंत दंड

सामूहिक धर्मांतर किंवा संस्थांच्या सहभागाच्या प्रकरणात : समान कठोर शिक्षा

पुन्हा गुन्हा केल्यास दहा वर्षांपर्यंत कारावास आणि ७ लाख रुपयांपर्यंत दंड. 

धर्मांतरासंबंधातील या सर्व गुन्ह्यांना दखलपात्र आणि अजामीनपात्र  घोषित करण्यात आले असून, त्यांची सुनावणी सत्र न्यायालयात होईल.

सरकारचे स्पष्टीकरण

विधेयकाच्या उद्दिष्ट आणि कारणांच्या निवेदनात राज्य सरकारने म्हटले आहे की जबरी, फसवणूक किंवा प्रलोभन देऊन होणाऱ्या धर्मांतरांच्या घटना वाढत आहेत. काही संस्था संघटित पद्धतीने अशा घटना घडवत असल्याचेही सरकारने नमूद केले आहे.

सरकारच्या मते, गिफ्ट, पैसे, नोकरी, मोफत शिक्षण, लग्नाचे आश्वासन, चांगल्या जीवनशैलीचे प्रलोभन किंवा ‘दैवी उपचार’ अशा दाव्यांद्वारे असुरक्षित व आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांना धर्मांतरासाठी प्रवृत्तकेले जात असल्याच्या घटना समोर आल्या आहेत.

जर हे विधेयक मंजूर झाले, तर उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू यांसारख्या राज्यांनंतर अशा प्रकारचा कायदा करणारे महाराष्ट्र किमान दहावेराज्य ठरेल.

प्रलोभन, दबाव, प्रभाव किंवा कपटी मार्ग असेल तर...

विधेयकात लग्नाच्या नावाखाली फसवणूक, दबाव, खोटे आश्वासन किंवा अन्य फसवे मार्ग वापरून केलेले धर्मांतरदेखील बेकायदेशीर मानले जाईल. धर्मांतर घडवून आणण्यासाठी प्रलोभन, दबाव, धमकी, चुकीची माहिती, फसवणूक, प्रभाव किंवा इतर कपटी मार्ग वापरणेही गुन्हा ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Inform District Collector Before Conversion; Bill Introduced, Stricter Penalties Proposed

Web Summary : Maharashtra introduces a bill requiring prior notification to the District Collector for religious conversions. Illegal conversions through coercion or fraudulent means will face up to 7 years imprisonment and a fine of ₹1 lakh. The bill also addresses mass conversions and provides for victim rehabilitation.
टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र