शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

मागच्या बाकावर बसलो तर सगळ्यांचीच अडचण!

By admin | Updated: July 22, 2016 05:47 IST

‘भ्रष्टाचाराच्या बेछूट आरोपांमुळे मी पहिल्या बाकावरून चौथ्या रांगेतील बाकावर आलो, परंतु मला सत्तेची अजिबात हाव नाही.

मुंबई : ‘भ्रष्टाचाराच्या बेछूट आरोपांमुळे मी पहिल्या बाकावरून चौथ्या रांगेतील बाकावर आलो, परंतु मला सत्तेची अजिबात हाव नाही. मी मागच्या बाकावरच बसलो, तर ते सत्ताधारी आणि विरोधकांनाही परवडणारी नाही,’ असा गर्भित इशारा देत, ‘माझ्या पोटात एक आणि ओठात दुसरं असं नाही,’ असे माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी ठणकावून सांगितले. मात्र, खडसे यांचे भाषण सुरू होताच, त्यांना एक चिठ्ठी पाठवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस निघून गेले. विरोधी पक्षांनी नियम २९३ अन्वये उपस्थित केलेल्या कलंकित मंत्र्यावरील चर्चेत सत्ताधारी पक्षाकडून खडसे यांनी विधानसभेत आपली बाजू मांडली. ते म्हणाले, ‘माझ्यावर आयुष्यात एक आरोप झाला नसताना १५ दिवसात हिंदुस्थानात बदनाम करून ठेवले. ४० वर्षातील राजकीय जीवन एका क्षणात उद्ध्वस्त केले. परंतु मी कुणाला घाबरणार नाही. पण दु:ख वाटते. राजकीय पक्षांनी आरोप केले असते तर चालले असते पण इथे गल्लीतील पुरावे नसतांना ते केले. आज माझ्यावर ही वेळ आली, उद्या ती तुमच्यावरही येऊ शकते, असे सांगत खडसे यांनी दाऊद फोन कॉल, गजानन पाटील याच्या ३० कोटींची लाच प्रकरण ते भोसरी येथील जमीन खरेदी प्रकरणी झालेल्या सर्व आरोपांचे गुरुवारी खंडन केले. आधी दाऊदची पत्नी मेहजबीन, नंतर अंजली दमानिया, प्रीती मेमन अशा माझ्यावर आरोप करायला महिलाच मिळाल्यात का, माणसे नव्हती काय, असा सवालही त्यांनी केला. शेतजमिनी व्यतिरिक्त दुसरे काही आढळल्यास मी राजकीय संन्यास घेईन, परंतु बेछूट आरोप करू नका. इथे सगळे नालायक, चोर-उचक्के बसलेत का सभागृहात काहीही आरोप करायला, असे सांगून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. खडसे यांच्या आजच्या भाषणात विरोधकांबरोबर स्वपक्षातील मंडळींनाही मार्मिक टोले होते. त्यामुळे खडसेंनी नेमका कोणावर निशाणा साधला, याचीच चर्चा विधिमंडळात होती.(प्रतिनिधी)>आरोप पुराव्यानिशी करापुरावे नसलेले आरोप करून काही लोकांनी माझे, माझ्या कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला, पण आरोप करायचे असतील, तर ते पुराव्यानिशी करा. मी विरोधी पक्षात असताना जे काही या सभागृहात बोललो, ते पुराव्यानिशी बोललो आहे.मी पुरावे दिल्यामुळेच तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ५२ प्रकरणांची चौकशी लावली होती, याची आठवणही त्यांनी करून दिली.>कोण हा भंगाळे? माझ्यावर दाऊदच्या पत्नीच्या फोनवर संभाषण केल्याचा आरोप मनीष भंगाळेमार्फत करण्यात आला. कोण हा भंगाळे? मी दाऊदच्या बायकोशी कशाला बोलू? दाऊदशी बोलल्याचा आरोप झाला असता, तर एक वेळ समजता आले असते, पण त्याची बायको माझ्याशी कशाला बोलेल?