शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

"राजीनामाच देतोय म्हणताय तर, माझी तुम्हाला विनंती आहे की...", मनोज जरांगेंचं फडणवीसांना प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:21 IST

Manoj Jarange Patil Criticize Devendra Fadnavis: मी कुठलंही आढवेढं घेत नाही, राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही राज्याचे कर्ते आहात. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलंय, ते तुम्ही द्या ना. (Maratha Reservation) सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही रोखलीय, हे तुम्ही नाकारून चालणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आज मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरक्षण द्यायचं आहे, मात्र देवेंद्र फडणवीस ते देऊ देत नाहीत, असा आरोप मनोज जरांगे पाटील यांनी केला होता. त्यानंतर मराठा आरक्षणामध्ये जर मी अडथळा ठरत असेन तर मी राजीनामा द्यायला तयार आहे, असं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आता मनोज जरांगे यांनीही आरोपांचा पुनरुच्चार केला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा आरक्षण रोखलं, असा दावा केला आहे. 

मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा एकदा टीका करताना मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आम्ही तुम्हाला विरोधक मानलेलं नाही. हे तुम्ही का समजून घेत नाही. तुमच्यावर अशी भाषा बोलण्याची वेळ का आली? शेवटी तुम्ही या राज्यातील कर्ते आहात. आता तुम्ही इतक्या हताशपणे राजीनामा देईन, असं म्हणायला लागलात. मराठ्यांविरोधात गेल्याचा पश्चाताप तुम्हाला झाला आहे. तुम्ही राजीनामा देईन म्हणताय, तर माझी तुम्हाला सरळ सरळ विनंती आहे. मी कुठलंही आढवेढं घेत नाही, राजकीय भाषा बोलत नाही. तुम्ही राज्याचे कर्ते आहात. तुम्ही मराठ्यांचं आरक्षण रोखलंय, ते तुम्ही द्या ना. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी तुम्ही रोखलीय, हे तुम्ही नाकारून चालणार नाही, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला. 

त्याआधी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सगळं काही द्यायचे आहे. मग ते सगेसोयरे असेल, मराठा आरक्षण असेल मात्र देवेंद्र फडणवीस हे त्यांना करू देत नाही असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केला होता. त्यानंतर राज्याचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्र्यांकडे असतात. इतर सर्व मंत्री मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या अधिकारावर काम करत असतात. एकनाथ शिंदे आणि मी एकत्रित काम करतो. शिंदेंना पूर्ण पाठबळ आणि पाठिंबा माझा आहे. त्यामुळे जरांगेंनी केलेल्या आरोपावर एकनाथ शिंदेंनी उत्तर द्यावं. मी मराठा आरक्षणाच्या मध्ये येतोय असं मुख्यमंत्री म्हणाले तर मी माझ्या पदाचा राजीनामा देईन आणि राजकारणातून निवृत्त होईन, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले होते. 

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaratha Reservationमराठा आरक्षण