गळ्यावर चाकू ठेवला तरी 'भारत माता की जय' बोलणार नाही - असदुद्दीन ओवेसी

By Admin | Updated: March 14, 2016 17:53 IST2016-03-14T16:53:58+5:302016-03-14T17:53:02+5:30

मी भारत माता की जय अशी घोषणा देणार नाही असं वक्तव्य एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे

If you put a knife on your neck, you will not say 'Bharat Mata Ki Jai' - Asaduddin Owaisi | गळ्यावर चाकू ठेवला तरी 'भारत माता की जय' बोलणार नाही - असदुद्दीन ओवेसी

गळ्यावर चाकू ठेवला तरी 'भारत माता की जय' बोलणार नाही - असदुद्दीन ओवेसी

 
ऑनलाइन लोकमत - 
लातूर, दि. १४ - 'मी भारत माता की जय अशी घोषणा देणार नाही', असं वक्तव्य ऑल इंडिया मजलीस इत्तेहदुअल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. उदगीरमधील रॅलीमध्ये त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. काही दिवसांपुर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलांना भारत माता की जय घोषणा देण्यास शिकवावं लागेल असं म्हटलं होत, त्यावर टीका करत असदुद्दीन ओवेसी यांनी हे वक्तव्य केलं आहे.
 
'मी ती घोषणा देत नाही. तुम्ही काय करणार आहेत भागवत साहेब. तुम्ही माझ्या गळ्यावर चाकू ठेवलात तरी मी ती घोषणा देणार नाही', असं वक्तव्य असदुद्दीन ओवेसी यांनी केलं आहे. आपल्या संविधानात कोठेही भारत माता की जय ही घोषणा प्रत्येकाने दिली पाहिजे असं सांगितलं गेलेलं नाही. जेएनयूच्या वादावर बोलताना मोहन भागवत यांनी आजकालच्या मुलांना 'भारत माता की जय' बोलायला शिकवावं लागेल असं म्हटल होतं. यावेळी बोलताना ओवेसी यांनी इशरत जहाँच्या कुटुंबाला पाठिंबा देणार असल्याचंही म्हंटल आहे. 
 

Web Title: If you put a knife on your neck, you will not say 'Bharat Mata Ki Jai' - Asaduddin Owaisi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.