शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर फडणवीस, अजित पवारांना बडतर्फ करावं; संजय राऊतांचं खुलं चॅलेंज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2024 16:57 IST

आम्ही ठामपणे सांगतोय. हे घटनाबाह्य सरकार आहे. जितका वेळ काढायचा तो वेळ काढतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला. 

पुणे - एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री आहेत पण ते राज्याचे नेते नाहीत. एकनाथ शिंदे यांचे ऐकावं असं ते नेते नाहीत. ते घटनाबाह्य पद्धतीने पदावर बसलेत. राहुल नार्वेकरांनी काहीही निर्णय दिला असला तरी एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदावर बेकायदेशीर बसले आहेत. शिंदे स्वत:ला नेते साध्य करण्यासाठी कधी काय निर्णय करतील हे मला सांगता येत नाही. एकनाथ शिंदे यांच्या मराठा आंदोलनाला मॅनेज करण्याची क्षमता नाही. हा अंतर्गत राजकारणाचा घोटाळा आहे अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला. 

पुण्यात सुषमा अंधारे यांनी संजय राऊतांची मुलाखत घेतली त्यात संजय राऊत म्हणाले की, जेव्हा एखादा मुख्यमंत्री भूमिका मांडतो तेव्हा ती संपूर्ण सरकारची भूमिका असते. सरकार ती भूमिका मांडताना त्यांच्या मंत्रिमंडळातला सहकारी वेगळी भूमिका घेऊन मुख्यमंत्र्यांना आव्हान देत असेल तर तो सरकारविरोधात बंड करतोय. अशावेळी मुख्यमंत्री त्या मंत्र्याला बरखास्त करण्याची शिफारस राज्यपालांना करू शकतात. पण ज्याअर्थी आतापर्यंत देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेतायेत, मुख्यमंत्री वेगळे बोलतायेत. छगन भुजबळ वेगळे मांडतायेत. याचा अर्थ सरकारच्या मंत्रिमंडळात बेबनाव आहे. म्हणून मुख्यमंत्री खरोखरच सक्षम असतील तर दोन्ही उपमुख्यमंत्री आणि छगन भुजबळ यांना मी बडतर्फ करतोय अशी शिफारस राज्यपालांना केली पाहिजे. हिंमत असेल तर ते नेते असं खुलं चॅलेंज राऊतांनी एकनाथ शिंदेंना दिले आहे. 

तसेच तू ओबीसींची भूमिका घे, मी मराठ्यांची भूमिका मांडतो. दोघांना मुर्ख बनवतो असं सत्ताधाऱ्यांचे असू शकते. कुरघोडी करण्याची क्षमता एकनाथ शिंदे यांच्यात नाही. आम्ही पहिल्यादिवसापासून विधानसभा बरखास्त करा आणि निवडणुकीला सामोरे जा असं म्हणतोय. परंतु या सरकारमध्ये हिंमत नाही. जनतेच्या मनात काय हे समजायचे असेल तर निवडणूक घ्या. १४ महापालिका निवडणूक रखडल्या आहेत. न्यायव्यवस्था तुमची गुलाम आहे. तुम्ही आता निवडणूक घ्या. आम्ही ठामपणे सांगतोय. हे घटनाबाह्य सरकार आहे. जितका वेळ काढायचा तो वेळ काढतायेत असा आरोप संजय राऊतांनी केला. 

दरम्यान, ज्यादिवशी देशातील जनता रस्त्यावर उतरून ईव्हीएम जाळेल तेव्हा भाजपा हरेल. भाजपा जिंकत नाही तर मशिन जिंकते. अलीकडच्या काळात मध्य प्रदेशात जे निकाल लागले ते लागूच शकत नव्हते. काहीतरी गडबड आहे. EVM नसेल तर भाजपा ग्रामपंचायतही जिंकणार नाही. EVM मध्ये घोटाळा आहे हा किडा काढणारे भाजपाचेच होते. काँग्रेस सरकार असताना सगळ्यात आधी किरिट सोमय्या पुढे आले. देशभरात EVM घोटाळ्याबाबत जागरुक करण्याचे काम भाजपाने आधी केले. घटनात्मक संस्था एक दोन व्यक्तीच्या गुलाम बनून काम करणार असतील तर न्याय कशा मिळणार? देशातील लोकशाहीचे मालक गुजरातमधील दोन व्यापारी झालेत असा घणाघात संजय राऊत यांनी केला. 

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतEknath Shindeएकनाथ शिंदेSushma Andhareसुषमा अंधारे