शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

हिंमत असेल तर गुंतवणुकीवर श्वेतपत्रिका काढून दाखवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 06:09 IST

साडेतीन वर्षात राज्य सरकारने अतिरंजीत दावे, जुमलेबाजी, खोटी आकडेवारी, फसव्या घोषणा याशिवाय काहीही दिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र मॅग्नेटिक राहिला नसून पॅथेटिक झाला आहे

मुंबई : साडेतीन वर्षात राज्य सरकारने अतिरंजीत दावे, जुमलेबाजी, खोटी आकडेवारी, फसव्या घोषणा याशिवाय काहीही दिलेले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्र मॅग्नेटिक राहिला नसून पॅथेटिक झाला आहे. हिंमत असेल तर गुंतवणुकीचे आकडे जाहीर करण्याऐवजी त्याची श्वेतपत्रिका काढा, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी आव्हान दिले.मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या माध्यमातून १६ लाख कोटींपेक्षा अधिक गुंतवणुकीचे करार झाले असून त्यातून ३८ लाख रोजगार निर्माण होतील, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे. पण गारपीटग्रस्त शेतकºयांप्रमाणे हातात किती गुंतवणूक केली, हे लिहिलेली पाटी घेऊन काढलेला एकाही उद्योजकाचा फोटो दिसला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला. मेक इन इंडियाच्या इव्हेंटमध्ये ८ लाख कोटींचे सामंजस्य करार झाले. यातून ३० लाख रोजगार निर्माण होतील, असा दावा होता. परंतु याचे कुठलेही पुरावे दिले नाहीत. सरकारने मॅग्नेटिक महाराष्ट्रच्या जाहिरातींवर आणि इव्हेंट मॅनेजमेंटवर किती खर्च झाला हे तर सांगावेच सोबतच राज्यात आलेल्या गुंतवणुकीबाबत श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी त्यांनी केली.केंद्राच्या सूक्ष्म व लघु व मध्यम उद्योग मंत्रालयाने सप्टेंबर २०१५ पासून उद्योग आधार क्रमांक मेमोरेंडम केंद्र सरकारच्या वेबसाईटवर नोंदणी करणे अनिवार्य केले. यातील आकडेवारी पाहता राज्यात सुक्ष्म लघु, मध्यम उद्योगात केवळ ४ लाख ४ हजार ८०१ उद्योगांची नोंदणी झाली आहे. त्यात महाराष्ट्र हा बिहार, तामिळनाडू, गुजरात, उत्तर प्रदेशच्या मागे आहे. असंवेदनशील कार्यपद्धती, चुकीच्या प्राथमिकता यामधून जनमाणसांत आक्रोश आहे. तीन वर्षांत राज्यातील गुंतवणुकीचे अतिरंजित आकडे दिले असून रिझर्व्ह बँकेच्या नुकत्याच प्रकाशित झालेल्या अहवालात देशातील कॉपोर्रेट गुंतवणुकीत गुजरात महाराष्ट्राच्या पुढे आहे. फॉक्सकॉन महाराष्ट्रातून का गेली? स्वीडीश फर्निचर कंपनीही गेली. पंतप्रधानांच्या दबावामुळे मुंबईत होणारे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र गुजरातला गेले, त्याचीही उत्तरे फडणवीस यांनी द्यायला हवीत, असेही चव्हाण म्हणाले.

टॅग्स :Magnetic Maharashtraमॅग्नेटिक महाराष्ट्रAshok Chavanअशोक चव्हाण