हिंमत असेल तर महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांवर बोला - नितेश राणेंचे कर्नाड यांना आव्हान

By Admin | Updated: November 13, 2015 12:05 IST2015-11-13T11:57:14+5:302015-11-13T12:05:21+5:30

हिंमत असेल तर गिरीश कर्नाड यांनी महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांविषयी बोलावे व ते परत जाऊ शकतील का हे बघावे असा धमकीवजा इशाराच काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांनी दिला आहे.

If you have the courage, come to Maharashtra and talk to Shivaji Maharaj - challenge Nitesh Rane's Karnad | हिंमत असेल तर महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांवर बोला - नितेश राणेंचे कर्नाड यांना आव्हान

हिंमत असेल तर महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांवर बोला - नितेश राणेंचे कर्नाड यांना आव्हान

ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. १३ -  हिंमत असेल तर गिरीश कर्नाड यांनी महाराष्ट्रात येऊन शिवाजी महाराजांविषयी बोलावे व ते परत जाऊ शकतील का हे बघावे असा धमकीवजा इशाराच काँग्रेसचे आमदार व स्वाभिमानी संघटनेचे संस्थापक नितेश राणे यांनी  दिला आहे. 

टिपू सुलतान यांच्या जयंतीवरुन कर्नाटकमध्ये सध्या वाद निर्माण झाला असून गिरीश कर्नाड यांनी टिपू सुलतान हिंदू असते तर त्यांनादेखील शिवाजी महाराजांसारखा मान मिळाला असता असे विधान केले होते. गिरीश कर्नाड यांच्या विधानावरुन वाद निर्माण झाला असून शुक्रवारी नितेश राणे यांनी ट्विटरवरुन या वादावर प्रतिक्रिया दिली आहे. कर्नाटकमध्ये जो वाद सुरु आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. पण कर्नाड यांनी कोणासोबतही शिवाजी महाराजांची तुलना करु नये. शिवाजी महाराज हे सर्वांपेक्षा थोर राजा होते. हिंमत असेल तर कर्नाड यांनी महाराष्ट्रात येऊन महाराजांवर बोलावे व ते परत जाऊ शकतील का हे बघावे असे आव्हानच त्यांनी दिले आहे. कर्नाड यांनी आमच्या बॉलिवूडमध्ये अनेक वर्षांपासून पैसे कमवले व आता ते महाराजांवर बोलण्याची हिंमत दाखवतात. कर्नाड यांनी माफी मागावी किंवा मराठांच्या रोषाला सामोरे जावे असेही राणेंनी म्हटले आहे. 

Web Title: If you have the courage, come to Maharashtra and talk to Shivaji Maharaj - challenge Nitesh Rane's Karnad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.