शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

तुम्हाला उमेदवारी मिळाली तर मी, मला जाहीर झाली तर तुम्ही...; ठाकरेंच्या पैलवानाचे विशाल पाटलांना पुन्हा आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2024 15:12 IST

Vishal Patil Sangli Lok sabha: सांगलीत मविआला मोठा दगाफटका होण्याची शक्यता असून काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील नॉट रिचेबल झाले आहेत. तर समर्थकांनी उद्या मतदारसंघातील नेत्यांची बैठक बोलावली आहे.

एवढे दिवस महाविकास आघाडीचे सांगलीवरून अडकलेले जागावाटपाचे गुऱ्हाळ आज संपले. ठाकरे गट शिवसेना २१, काँग्रेस १७ आणि शरद पवार राष्ट्रवादी १० असे जागावाटप जाहीर करण्यात आले. असे असले तरी सांगलीत मविआला मोठा दगाफटका होण्याची शक्यता असून काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील नॉट रिचेबल झाले आहेत. तर समर्थकांनी उद्या मतदारसंघातील नेत्यांची बैठक बोलावली आहे. यात पाटील लढण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे. अशातच ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवार पैलवान चंद्रहार पाटलांनी विशाल पाटलांना पुन्हा एकदा साद घातली आहे. 

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी माझी उमेदवारी अगोदरच जाहीर केली होती. आज महाविकास आघाडीकडून माझ्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाला आहे. सर्व महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते माझा प्रचार करतील. उद्धव ठाकरे, शरद पवार यांच्यासहित वरिष्ठ नेत्यांची सांगलीत सभा घेणार आहेत. येत्या दोन दिवसांत महाविकास आघाडीतील घटक पक्षांची भेट घेऊन प्रचाराचे नियोजन केले जाणार आहे, अशी प्रतिक्रिया चंद्रहार पाटलांनी दिली आहे.

याचबरोबर विशाल पाटील यांच्या संभाव्य बंडखोरीवर बोलताना त्यांनी पूर्वी देखील मी विशाल पाटील यांना आवाहन केले होते की विशाल पाटील यांना जरी उमेदवारी जाहीर झाली तर मी त्यांचा प्रचार करीन. माझी उमेदवारी जाहीर झाली तर तुम्ही माझा प्रचार करा. त्याच पद्धतीने विशाल पाटील यांनी देखील मला विजय करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन चंद्रहार पाटलांनी केले आहे. 

टॅग्स :chandrahar patilचंद्रहार पाटीलvishal patilविशाल पाटीलsangli-pcसांगलीmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४