अधिकार न मिळाल्यास महसूलची प्रकरणे बाहेर काढेन

By Admin | Updated: February 19, 2015 02:05 IST2015-02-19T02:05:30+5:302015-02-19T02:05:30+5:30

मला माझे अधिकार मिळायला हवेत. युतीमध्ये असे चालणार नाही. मला अधिकार दिले नाही तर सेना स्टाईलने काम करून महसूलमधील प्रकरणे बाहेर काढेन,

If you do not get the right, you can get out of revenue matters | अधिकार न मिळाल्यास महसूलची प्रकरणे बाहेर काढेन

अधिकार न मिळाल्यास महसूलची प्रकरणे बाहेर काढेन

जळगाव : मला माझे अधिकार मिळायला हवेत. युतीमध्ये असे चालणार नाही. मला अधिकार दिले नाही तर सेना स्टाईलने काम करून महसूलमधील प्रकरणे बाहेर काढेन, असा निर्वाणीचा इशारा महसूल राज्यमंत्री संजय राठोड यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना दिला.
राज्यमंत्री राठोड म्हणाले, राज्य निर्मितीपासून महसूल राज्यमंत्र्यांकडे देवस्थान, इनाम यांचे अधिकार होते. ते आता नाहीत. पण लाचलुचपत प्रतिबंध प्रकरणाशी संबंधित अधिकार तुम्हाला मिळणार नाहीत असे महसूलमंत्री एकनाथराव खडसे यांनी सांगितले. पण मी ते अधिकार मागितलेच नव्हते. पण राज्य निर्मितीपासून जे अधिकार राज्यमंत्र्यांना होते ते मिळावेत एवढीच माझी मागणी आहे. अधिकार नाही मिळाले, तर आपण राजीनामा देणार होतात. त्याचे काय झाले, असे विचारले असता राठोड म्हणाले, मी राजीनामा देण्याचे म्हटले नव्हते. पण अधिकारच नसतील तर कशाला हवा लाल दिवा मिरवायला असे म्हटले होते, अश्ी सारवासारवही त्यांनी केली.
गिरीश महाजनांसोबत गुप्तगू
राठोड हे अजिंठा विश्रामगृहात आल्यानंतर त्यांनी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्याशी एकांतात चर्चा केली. (प्रतिनिधी)

Web Title: If you do not get the right, you can get out of revenue matters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.