सत्तेवर आल्यास खेड्यापाड्यांमध्ये शिव आरोग्य सेवा - उद्धव ठाकरे
By Admin | Updated: September 7, 2014 17:00 IST2014-09-07T16:57:29+5:302014-09-07T17:00:48+5:30
सत्तेवर आल्यास शिवआरोग्य सेवेमार्फत तंत्रज्ञानाचा वापर करत खेड्यापाड्यांमध्ये आरोग्यसुविधा उपलब्ध करुन देऊ अशी घोषणा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

सत्तेवर आल्यास खेड्यापाड्यांमध्ये शिव आरोग्य सेवा - उद्धव ठाकरे
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. ७ - सत्तेवर आल्यास शिवआरोग्य सेवेमार्फत तंत्रज्ञानाचा वापर करत खेड्यापाड्यांमध्ये आरोग्यसुविधा उपलब्ध करुन देऊ अशी घोषणा शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी केली आहे. शिवसेनेच्या व्हिजन डॉक्यूमेंटचा तिसरा टप्पा रविवारी जाहीर करण्यात आला असून तिस-या टप्प्यात उद्धव ठाकरे यांनी शिवआरोग्य सेवेची माहिती दिली.
शिव आरोग्य सेवेत टेलि मेडिसीन म्हणजेच टेलि कॉन्फरन्सीगच्या माध्यमातून मुंबई- पुण्यातील तज्ज्ञ डॉक्टर राज्यातील दुर्गम भागात आरोग्य सुविधा देऊ शकतील असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. या योजनेचे प्रात्यक्षिकही याप्रसंगी दाखवण्यात आले. शिवसेनेचे व्हिजन डॉक्यूमेंट ही केवळ आऊटलाईन सत्तेत आल्यावर त्यामध्ये रंग भरु. व्हिजन डॉक्यूमेंटमधील योजनांची अंमलबजावणी होईलच याची दक्षता घेऊ असे आश्वासनही उद्धव ठाकरेंनी दिले. यापूर्वी शिवसेनेने व्हिजन डॉक्यूमेंटमधील दोन टप्पे जाहीर केले होते. यामध्ये रस्ते नियोजन आणि ईशिक्षणावर भर देण्यात आला होता.