शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

जमत नसेल तर राजकारण सोडून द्या, पंकजांचा धनंजय मुंडेंना सणसणीत टोला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:28 IST

पंकजा मुंडे आणि भाजपाच्या नेत्यांनी कुशलपणे राजकीय व्यवस्थापन करत या लढतीत बाजी मारली.

मुंबई: एखाद्याला राज्य पातळीवरचे मोठे राजकारण करायला जमत नसेल तर त्यांनी राजकारण सोडून द्यायला पाहिजे, अशा शब्दांत ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांना टोला लगावला. लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर त्या पत्रकार परिषदेत बोलत होत्या. धनंजय व पंकजा मुंडे या भावंडांतील अंतर्गत स्पर्धेमुळे लातूर-बीड-उस्मानाबाद विधानपरिषद निवडणूक रंगतदार झाली होती. पंकजा मुंडे आणि भाजपाच्या नेत्यांनी कुशलपणे राजकीय व्यवस्थापन करत या लढतीत बाजी मारली. भाजपाचे सुरेश धस यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवार अशोक जगदाळे यांचा 76 मतांनी पराभव केला.  याविषयी बोलताना पंकजा मुंडे यांनी म्हटले की, या निवडणुकीच्या निमित्ताने आमच्या विरोधकांनी राजकारणातील अपरिपक्वतेची परिसीमा दाखवून दिली. राष्ट्रवादीने या निवडणुकीसाठी रमेश कराड यांना पक्षात घेतले. मात्र, त्यानंतर कराड यांच्यावर इतका दबाव आला की, त्यांनी माझ्याशी चर्चा करुन निवडणुकीतून माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीकडे स्वत:चा अधिकृत उमेदवार राहिला नाही. अखेर त्यांना अपक्ष उमेदवाराला पाठिंबा द्यावा लागला. हे सर्व करताना त्यांनी मित्रपक्षांना कुठेही विश्वासात घेतले नाही. त्यामुळे या निवडणुकीत सुरुवातीपासूनच विरोधकांचं गणित चुकत होतं. राज्यपातळीवर राजकारण करण्यासाठी जी समज लागते ते करण्यात विरोधक कमी पडले. त्यामुळे विरोधक केवळ जिंकण्याच्या वल्गना करत राहिले. परंतु राजकारणात अंतिम निर्णय आल्याशिवाय कोणतेही मत व्यक्त करणे योग्य नसते. त्यामुळे मी स्वत:चे काम करत राहिले आणि केवळ वल्गना करणाऱ्यांना आज तोंडघशी पडावे लागले, असे पंकजा यांनी सांगितले. 

टॅग्स :Pankaja Mundeपंकजा मुंडेDhananjay Mundeधनंजय मुंडेElectionनिवडणूक