जिओ वापरताय तर हे नक्कीच वाचा

By Admin | Updated: February 14, 2017 17:43 IST2017-02-14T17:34:48+5:302017-02-14T17:43:23+5:30

अल्पावधीतच रिलायन्स जिओनं ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. रिलायन्स जिओची फ्री सेवा मार्चनंतर बंद होण्याची शक्यता आहे.

If you are using Geo then definitely read it | जिओ वापरताय तर हे नक्कीच वाचा

जिओ वापरताय तर हे नक्कीच वाचा

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 14 - अल्पावधीतच रिलायन्स जिओनं ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केले आहे. रिलायन्स जिओची फ्री सेवा मार्चनंतर बंद होण्याची शक्यता आहे. एप्रिलपासून जिओ ग्राहकांवर नाममात्र दर आकारण्याच्या विचारात आहे. यासाठी जिओ 100 ते 150 रुपये चार्ज करण्याची शक्यता आहे. सध्या जिओच्या ग्राहकांची संख्या 7.2 कोटी पेक्षा जास्त आहे. जर ही सेवा बंद झाली तर या ग्राहकांवर याचा मोठा परिणाम पडू शकतो.
मीडिया रिपोर्टनुसार, सध्या जिओवर फ्री सर्विस बंद करण्यासाठी दबाव वाढत आहे. शिवाय आपला यूजर बेस निश्चित करण्यासाठी रिलायन्स जिओ मार्च-एप्रिलपासून ट्रायल बिलींग सुरु करण्याची शक्यता आहे. यामध्ये ग्राहकांना कंपनीच्या विविध प्लॅन पैकी एकाची निवड करण्यास सांगितले जाऊ शकते.

रिलायन्स जूनपर्यंत फ्री सर्व्हिस देण्याच्या विचारात होते. मात्र प्रतिस्पर्धी कंपन्यांनी प्रमोशनल ऑफर संदर्भात ट्रायकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे त्यांच्यावर मोठा दबाव आला आहे. त्यामुळे जिओला फ्री सर्व्हिस बंद करावी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिओनं बिलिंगचा पर्याय निवडल्याचं बोललं जातं आहे.

भारती एअरटेल लिमिटेड आणि आयडिया सेल्यूलर लिमिटेडने जिओविरोधात टेलिकॉम डिस्पूट सेटलमेंट आणि एलिटेड ट्रॅब्यूनलमध्ये अपील केले आहे. या दोन्ही ऑपरेटर्सची तक्रार आहे की फ्री सर्व्हिसला एक्सटेंशन देणे ट्रायच्या नियमांचे उल्लंघन आहे. यावर ट्रायने जिओने नियमांविरोधात काही केले नसल्याचे म्हटले आहे. तसंच जिओ आणि प्रतिस्पर्धी टेलिकॉम यांच्या अपीलावर ट्रॅब्यूनलने अद्याप निर्णय दिलेला नाही.

Web Title: If you are using Geo then definitely read it

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.