‘चुकीचे वागाल तर, सेनेचा आवाज दाखवू’

By Admin | Updated: July 10, 2016 02:39 IST2016-07-10T02:39:30+5:302016-07-10T02:39:30+5:30

अधिकारी चांगले काम करीत असतील तर त्यांच्या पाठीशी उभे राहणार, मात्र जर कुणी चुकीचे काम करीत असेल तसेच काम करणार नाही, तेथे शिवसेनेचा आवाज दाखवू, असा इशारा राज्यमंत्री

'If the wrong way, show the army sound' | ‘चुकीचे वागाल तर, सेनेचा आवाज दाखवू’

‘चुकीचे वागाल तर, सेनेचा आवाज दाखवू’

जळगाव : अधिकारी चांगले काम करीत असतील तर त्यांच्या पाठीशी उभे राहणार, मात्र जर कुणी चुकीचे काम करीत असेल तसेच काम करणार नाही, तेथे शिवसेनेचा आवाज दाखवू, असा इशारा राज्यमंत्री गुलाबराव पाटील यांनी येथे पहिल्याच पत्रकार परिषदेत दिला.
माझ्यावर मंत्रिपदाचे कोणतेही दडपण नाही. शिवसैनिकावर ते कधीच नसते. कार्यकर्ते व चाहत्यांच्या जल्लोशाने मी भारावून गेलो आहे. मी नव्हे, तर हा शेतकरी मंत्री झाला असल्याचे भावोद्गारही त्यांनी काढले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर शनिवारी दुपारी पाटील यांचे रेल्वे स्टेशनवर जल्लोषात स्वागत झाले.
खडसेंचे मंत्रिपद गेले आणि मला संधी मिळाली, असे नाही. त्यांच्याबाबत घेण्यात आलेला निर्णय हा त्यांच्या पक्षाचा आहे. ते या जिल्ह्याचे नेते आहेत. मला त्यांच्यासारखी १०-१२ खाती मिळणार नाहीत. पण जे मिळेल त्यात समाधान मानून संधीचे सोने करेन. पोटात घुसून काम करू शकतो तसा वठणीवरही आणू शकतो. राज्यमंत्री असलो, अधिकार कमी असले तरी काम करून दाखवेन, असेही ते म्हणाले.
मी खडसेंचा विरोधक नव्हतो व नाही. जेथे धोरणे चुकली तेथे बोलत गेलो. भविष्यातही बोलेल पण त्यामुळे त्यांचा विरोधक आहे, असे नाही. ते नेते आहेत. जेथे चुकेल ती चूक त्यांनी लक्षात आणून दिली, मार्गदर्शन केले तर ते मान्यही करणार असल्याचे पाटील म्हणाले. (प्रतिनिधी)

मुख्यमंत्र्यांचा लाडका
मी मुख्यमंत्र्यांचा लाडका आहे. विधानसभेत ज्या पद्धतीने भूमिका मांडतो, त्याला दे दाद देतात व कौतुकही करतात. पण म्हणून मला संधी मिळाली असे नाही, असेही पाटील यांनी सांगितले.

Web Title: 'If the wrong way, show the army sound'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.