आबांनी त्याचवेळी ऐकले असते तर...

By Admin | Updated: February 20, 2015 01:20 IST2015-02-20T01:20:39+5:302015-02-20T01:20:39+5:30

आबांनी त्याचवेळी ऐकले असते, तर ही वेळच आली नसती, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी त्यांना आदरांजली वाहिली.

If we had heard it at the same time ... | आबांनी त्याचवेळी ऐकले असते तर...

आबांनी त्याचवेळी ऐकले असते तर...

सावळज (सांगली) : ‘कॉमन मॅन’चे प्रतिनिधित्व करणारा निर्मळ मनाचा नेता गेला. मी आबांना जे सांगितले होते, ते आबांनी त्याचवेळी ऐकले असते, तर ही वेळच आली नसती, अशा शब्दांत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी त्यांना आदरांजली वाहिली.
पवार कुटुंबीय व स्वत: शरद पवार आबांच्या कुटुंबियांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहतील. बारामती व वाळव्याप्रमाणे तासगाव-कवठे महांकाळकडेही लक्ष देऊ, अशी ग्वाही त्यांनी अंजनी (ता. तासगाव) येथे झालेल्या पाटील यांच्या रक्षाविसर्जनाचा कार्यक्रमात दिली.
अंजनी-वडगाव रस्त्यावर पाटील यांच्या अंत्यविधीच्या ठिकाणी अनेक नेते, कार्यकर्ते व नागरिकांनी गर्दी केली होती. दाटलेल्या अंत:करणाने हजारो कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्या नेत्याच्या रक्षाविसर्जनाला उपस्थिती लावली.
अजित पवार, माजी मंत्री दिलीप वळसे-पाटील, वसंत डावखरे, माजी मंत्री आ. जयंत पाटील, आ. पतंगराव कदम, खा. संजय पाटील आदींनी पाटील यांना आदरांजली वाहिली. (प्रतिनिधी)

च्सर्व जनता हेच आबांचे कुटुंब होते. आबा आयुष्यभर लढले. मरणालाही ते लढत-लढत सामोरे गेले. आता आपण रडायचे नाही, लढायचे. आबांची अपूर्ण कामे पूर्ण करूया, असे आवाहन आबांच्या कन्या स्मिता पाटील यांनी केले. आबांच्या इच्छेनुसार दहावा, तेराव्याचा विधी गुरुवारीच करण्यात आला. राज्यातील सर्व जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना अस्थिकलश देण्यात आले.

हिरवेबाजारमध्ये व्यसनमुक्ती दिन
आर. आर. पाटील यांचा स्मृतिदिन व्यसनमुक्ती दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय हिवरेबाजारच्या श्रद्धांजली सभेत घेण्यात आला. पाटील गृहमंत्री असताना गावाला रुग्णवाहिका खरेदीसाठी २ लाखांचा निधी मिळाला होता. वास्तवत: रुग्णवाहिकेसाठी ७ लाखांचा निधी आवश्यक होता. मात्र, पाच लाख रुपये अन्य योजनेतून मिळू शकले नाहीत. त्यामुळे आबांच्या स्मृती कायमस्वरूपी जपल्या जाव्यात म्हणून त्यावेळी मिळालेले २ लाख आणि अन्य ५ लाख रुपये लोकवर्गणीतून उभारून वनौषधी उद्यान उभारण्यात येणार आहे.

अस्थींचे चंद्रभागेत विसर्जन
पंढरपूर : माजी उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या अस्थींचे गुरुवारी चंद्रभागेत विसर्जन करण्यात आले. अंजनी (जि. सांगली) येथून दुपारी साडेबाराच्या सुमारास अस्थी कलश फुलांनी सजविलेल्या टेम्पोमध्ये पंढरपुरात आणण्यात आला. सांगोला, खर्डी अशा अनेक ठिकाणी अस्थींचे दर्शन घेण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती. सायंकाळी सहाच्या सुमारास टाळ-मृदंगाच्या गजरात चंद्रभागेमध्ये आबांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.

Web Title: If we had heard it at the same time ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.