शौचालय बांधले असेल तर गावात या नाहीतर परत जा
By Admin | Updated: September 13, 2016 11:45 IST2016-09-13T11:45:34+5:302016-09-13T11:45:34+5:30
रिसोड तालुक्यातील केशवनगर (मसलापेन) या गावात लावण्यात आलेल्या फलकाने आगळेवेगळे स्वागत केले जात आहे.

शौचालय बांधले असेल तर गावात या नाहीतर परत जा
नंदकिशोर नारे, ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. १३ - कोणत्याही शहरात किंवा गावात आगमन केले की आपल्या निदर्शनास नगरपालिकेतर्फे शहरात तर ग्रामपंचायतच्यावतिने गावात आपले स्वागत आहेत चे फलक आपण पाहतो. परंतु रिसोड तालुक्यातील केशवनगर (मसलापेन) या गावात पोहचल्याबरोबर प्रथमदर्शी लावण्यात आलेल्या फलकाने आगळेवेगळे स्वागत केले जात आहे. गावात पोहचल्याबरोबर बसस्टॉप जवळ 'राम राम पाव्हणं. ..शौचालय बांधल असेल तर या नाहीतर परत जा' असे फलक लावण्यात आले आहे. या फलकाची जिल्ह्यात चांगलीच चर्चा सुरू आहे.